आज सकाळी जमनागिरी भागात पाणी आले असल्याचे नीता सोहीकेला घरासमोर राहणारी एक मुलगी सांगायला गेली. त्या मुलीने अंथरुणात नीता सोहीकेचा मृतदेह पाहिल्याने ती मुलगी घाबरून गेली. तिने लागलीच आजूबाजूच्या लोकांना या संदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली.
हेही वाचा -मी तुमचे भविष्य सांगतो, तुमच्या घरी लक्ष्मी आलीय म्हणत वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य
आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या संदर्भात आजूबाजूच्या नागरिकांनी सांगितले की, विनोद उर्फ बादल हा नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून नीताला मारहाण करत होता. काल रात्री देखील चारित्र्याच्या संशयावरून विनोदने नीताला बेदम मारहाण केली. नेहेमीप्रमाणे सकाळी ८.३० वाजता विनोद सोहीके हा घरून देवपूजा करून आपली रिक्षा घेऊन बाहेर निघून गेला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. विनोद सोहीके हा धुळे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो आपली ड्युटी झाल्यानंतर रिक्षा चालवत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.
हेही वाचा -पुतण्याचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू…आक्रोश करता करता काकूनेही सोडले प्राण… जळगाव हळहळलं…
घटनेची माहिती मिळताच विभागीय पोलीस उपाधीक्षक ऋषिकेश रेड्डी, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचासह शहर पोलीस ठाण्याच्या पथकासह फॉरेन्सिक टीम घेऊन दाखल होत घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हिरे शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. संशयित आरोपी विनोद उर्फ बादल सोहीके सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
हेही वाचा -दुचाकीवरुन मित्रासोबत जात असताना डंपरची धडक, जळगावात एसटी कर्मचाऱ्याने जीव गमावला