कर्जदारांना मोठा धक्का! SBI ने वाढवले ​​व्याजदर, आता भरावा लागणार जास्त EMI

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेचे (एसबीआय) गृहकर्ज महागले आहे. एसबीआयने एका वर्षाच्या कालावधीत MCLR ०.१० टक्क्यांनी वाढवला आहे. त्यामुळे गृहकर्जासह इतर अनेक कर्जावरील व्याजदर वाढले आहेत. नवीन दर १५ जानेवारीपासून लागू झाले आहेत. SBI सध्या आपल्या सणासुदीच्या ऑफर मोहिमेअंतर्गत गृहकर्जावर विविध सवलती देत आहे. ही ऑफर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. SBI ने आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारीपासून एक वर्षाचा MCLR वाढून तो ८.४ टक्के झाला आहे. पूर्वी तो ८.३० टक्के होता. याशिवाय, इतर मुदतीसाठी MCLR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

SBI चा २ वर्षे आणि ३ वर्षांच्या कालावधीसाठी MCLR सध्या अनुक्रमे ८.५० टक्के आणि ८.६० टक्के आहे. तर एक महिना आणि तीन महिन्यांसाठीचा MCLR ८ टक्के इतका आहे. याशिवाय ओव्हरनाइट MCLR ७.८५ टक्के इतका आहे.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! मातेनेच नवजात बालकाला शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकून दिले, गुन्हा दाखल

गृहकर्जावरील व्याजदर

SBI ने ४ ऑक्टोबर रोजी उत्सवी ऑफर मोहीम सुरू केली. ही ऑफर ३१ जानेवारी २०२३ पर्यंत आहे. या सणासुदीच्या ऑफरमध्ये बँक अनेक गृहकर्ज श्रेणींमध्ये ०.१५ ते ०.३० टक्के सूट देत आहे. SBI च्या गृहकर्जाचे दर देखील कर्जदाराच्या CIBIL स्कोअरवर अवलंबून असतात. तुमचा क्रेडिट स्कोअर जितका चांगला तितका गृहकर्जाचा व्याजदर कमी. SBI ग्राहकाचा CIBIL स्कोअर ८०० किंवा त्याहून अधिक असल्यास, SBI गृहकर्जाच्या व्याजदरावर ०.१५% सूट देते. यासह, व्याजदर सामान्य ८.९० टक्के दराऐवजी ८.७५ टक्के असेल. तुमचा CIBIL स्कोअर ७५० ते ७९९ दरम्यान असेल, तर तुम्हाला व्याजदरात ०.२५ टक्के सूट मिळेल. यासह, तुम्हाला ९ टक्क्यांऐवजी ८.७५ टक्के व्याजदर मिळेल. दुसरीकडे, जर क्रेडिट स्कोअर ७०० ते ७४९ दरम्यान असेल, तर गृहकर्जाची किंमत ०.२० टक्के सवलतीसह सामान्य दराने ९.१० टक्क्यांऐवजी ८.९० टक्के असेल.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल, गरोदर माता, मुलांचे आरोग्य धोक्यात

कमी क्रेडिट स्कोअर असल्यास उच्च व्याज दर

याशिवाय ७०० पेक्षा कमी क्रेडिट स्कोअरसाठी गृहकर्जाच्या दरांमध्ये कोणताही बदल होणार नाही. कमी क्रेडिट स्कोअरबद्दल बोलायचे झाल्यास, ६५० ते ६९९ क्रेडिट स्कोअरवर SBI गृह कर्जाचा व्याज दर ९.२० टक्के आहे. जर क्रेडिट स्कोअर ५५० ते ६४९ असेल तर व्याज दर ९.४० टक्के आणि CIBIL नसल्यास ९.१० टक्के आहे.

क्लिक करा आणि वाचा- भाऊ, तुम्ही देव आहात! मंत्री मुनगंटीवारांना भावुक चिमुकला असे का म्हणाला?

Source link

EMIHome LoanInterest rateMCLRsbiईएमआयएसबीआयकर्जदार
Comments (0)
Add Comment