संक्रांतीत जळगावात शोक, पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडला, १० वर्षीय मुलाने जीव गमावला

जळगाव: जळगावात संक्रांत सणाला गालबोट लागला आहे. येथील धरणगाव तालुक्यातील हिंगोणे गावात पतंग उडवताना तोल जाऊन विहिरीत पडल्याने एका दहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू जाला. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. अक्षय संजय महाजन (रा. कळमसरे ता. अमळनेर ह.मु. हिंगोणे ता. धरणगाव) असे मृत बालकाचे नाव असून सदर घटनेमुळे हिंगोणे गावात शोककळा पसरली आहे.

मकर संक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जात आहे. तथापि, यात काळजी न घेतल्यास दुर्घटना घडत असतात. अशीच एक दुर्घटना धरणगाव तालुक्यातील हिंगोणे येथे घडली आहे. येथे मूळचे अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले संजय महाजन (माळी) हे कुटुंब उदरनिर्वाहानिमित्त स्थायिक झालेले आहे. याच कुटुंबातील अक्षय संजय महाजन (माळी) हा मुलगा रविवारी दुपारी २ वाजता पतंग उडवत होता.

याप्रसंगी त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तो विहिरीत पडल्याचे कळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेवून त्याला बाहेर काढले. मात्र, तोवर त्याची प्राणज्योत मालविली होती. अक्षय माळी हा पाचवीत शिकत होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर हिंगोणे आणि कळमसरे गावावर यामुळे शोककळा पसरली आहे.

Source link

10 year old boy fell in well10 year old boy lost lifeboy died flying kiteboy fell in well and diedflying kiteJalgaonmakar sankranti newsमकर संक्रांती
Comments (0)
Add Comment