गुजरात राज्यातील वलसाड येथील कमलेश जोगारी हे रहिवासी असून आरोपींनी आम्हाला सिद्धी प्राप्त झाली आहे, असे सांगितले. दीड लाख रुपये आणून दे आणि प्राप्त सिद्धीच्या जोरावर तुला पाच लाख रुपये करून देऊ असे अमिष जोगारी यांना दाखवण्यात आले. जव्हार पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पैशाचा पाऊस पाडणारे लोक येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर जव्हार व मोखाडा पोलिसांनी खंबाळा दुरक्षेत्र हद्दीत सापळा रचला.
वाचाः बायकोपेक्षा ‘हॉट’ दिसतेस, तुला किस करावसं वाटतं; नराधमाने तरुणीचा पाठलाग केला अन्…
पोलिसांनी सापळा रचल्यानंतर एक इनोव्हा कार व मोटरसायकल संशयितरीत्या पोलीसांना आढळून आली. पोलिसांनी संशयित कारची झडती घेतली असता त्यात दोन हजार रुपयांच्या खोट्या नोटा व आतमध्ये दोन हजार रुपये मापाच्या कोऱ्या कागदांचे २७ बंडल, दोन हजार रुपयांच्या मापांचे कोऱ्या कागदाचे १२ बंडल व पाचशे रुपयांच्या ७५ खोट्या नोटा, नोटांच्या मापाचे दोन काचेचे तुकडे, पूजेचे सामान लोखंडी त्रिशूळ आढळून आले.
वाचाः रविवारी रात्री चंद्रपुरात जमीन हादरली, नागरिकांना भूकंपाची भीती, पण कारण वेगळेच
पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून यातील एक ४६ वर्षीय आरोपी भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी- गणेशपुरी व व उर्वरित दोन आरोपी विक्रमगड तालुक्यातील साखरे व आलोंडे या गावातील रहिवासी आहेत. टोयोटा इनोवा कार व एक मोटरसायकल त्याचप्रमाणे कारमध्ये आढळलेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जव्हार पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा.द.वि.स.420, 511, 489, (अ)(इ), 34 सह जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
वाचाः हिंगोलीत अपघातवार; भरधाव टेम्पोची टाटा मॅजिकला भीषण धडक, दोन जण जागीच ठार