मांत्रिकाला बोलावले, २ कोंबड्यांचा बळी दिला; नंतर खोदकामानंतर सोनं सापडल्याचा दावा

जालनाः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे मागील तीन दिवसांपुर्वी एका घरात खोदकाम करून सोने पळविले असल्याच्या अफवेने एकच खळबळ उडाली आहे.

या अफवेने सध्या गावात एकच चर्चा सुरु झाली आहे. शेजारी राहणाऱ्या महिलेला सोन्याच्या अपेक्षेने खोदकाम केल्याची ही गोष्ट माहीत झाल्यावर खोदकामातून निघालेल्या सोन्यात वाटा न दिल्याने या घटनेचे बिंग फुटले असल्याची देखील जोरदार चर्चा होतेय. शुक्रवारी मध्यरात्री एका कुटुंबाने गुजरात येथील मांत्रिकाला बोलावून घरात तीन बाय सहाचे खड्डे खोदून पूजा केल्याचा, संशय व्यक्त केला जात आहे.

वाचाः २०२३मध्ये महागाई मिटणार, पण नैसर्गिक आपत्ती पाठ धरणार, सिद्धेश्वर महायात्रेत वासराचे भाकित

कुटुंबाने पूजा करून २ कोंबड्यांचा बळी देऊन सोने पळवून नेल्याची नागरिकांत चर्चा होती. तसेच या घराच्या शेजारी एका महिलेला काही तरी खोदकाम होत असल्याचा तसेच बडबडण्याचा आवाज येत असल्याचे लक्षात येताच तिने दरवाज्याच्या फटीतून हा प्रकार पाहिल्याची चर्चा आहे.

वाचाः महाराष्ट्र गारठणार! राज्यात थंडीची लाट अधिक तीव्र होणार, ‘हे’ तीन दिवस महत्त्वाचे

याबाबत पारध पोलीसांना देखील माहिती देण्यात आली. रविवारी (दि. १५) रोजी पारध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे व पोलीस उपनिरीक्षक विलास घुसिंगे यांनी घटनास्थळी भेट देत नेमका काय प्रकार आहे हे पाहिले असता त्या ठिकाणी काहीही आढळून आले नसल्याची माहिती दिली आहे. सदर अफवेवर कुणी लक्ष देऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

वाचाः रविवारी रात्री चंद्रपुरात जमीन हादरली, नागरिकांना भूकंपाची भीती, पण कारण वेगळेच

Source link

gold found at homejalna live newsjalna newsजालना ताज्या बातम्याजालना बातम्या
Comments (0)
Add Comment