राजकीय धुरळ्यात सत्यजीत तांबेंची भावनिक पोस्ट व्हायरल, ‘जे कठीण काळात माझ्या बरोबर….. ‘

शिर्डी, अहमदनगर : नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. अमोल बाळासाहेब खाडे, डॉ. सुधीर सुरेश तांबे, दादासाहेब हिरामण पवार, धंजनय क्रिष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनराज देविदास विसपुते या सहा उमेदवारांनी पदवीधर मतदारसंघ निवणुकीतून माघार घेतली आहे. तर सत्यजीत तांबे यांच्यासह १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणुकीत भाजपचे इच्छुक उमेदवार धनंजय जाधव यांनी अर्ज मागे घेतला भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर अर्ज मागे घेतल्याची जाधव यांनी माहिती दिली. दुसरीकडे, निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याच्या अगोदर सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी आता सोशल मीडियावर भावनिक पोस्ट व्हायरल केली आहे. तसंच १८ किंवा १९ तारखेला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.

‘जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, चांगला काळ माझा फक्त तुमच्यासाठीच असेल’ अशा आशयाची पोस्ट व्हायरल होत असल्याने सत्यजित तांबे यांच्या मनात नेमकं काय चाललंय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सत्यजीत तांबे यांची पोस्ट व्हायरल

अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी आज अहमदनगरच्या कोपरगाव येथिल विविध शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन प्राध्यापक आणि शिक्षकांच्या गाठी भेटी घेउन आपली भूमिका त्यांच्या समोर मांडली आहे. यावेळी एका शिक्षण संस्थेच्या बाहेर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तांबे यांना आपल्या भूमिकेबाबत विचारले. मी माझी भूमिका १८ किंवा १९ जानेवारी रोजी स्पष्ट करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. मात्र कोपरगावात आल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी भाजपशी निगडित असलेल्या एका शिक्षण संस्थेला पहिली भेट दिली त्यानंतर रयतच्या संस्थांना भेट दिली. नेमकं सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार का? की महाविकास आघाडीतील पक्ष त्यांना पाठिंबा देणार हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे. पराभवाच्या भीतीने सत्यजीत तांबे यांच्या वतीने अशा प्रकारच्या भावनिक पोस्ट व्हायरल केले जात आहेत का? अशी चर्चाही पदवीधर मतदारांमध्ये सुरू आहे.

‘भाजप ज्याला पाठिंबा देईल तो डिस्टिंक्शनमध्ये पास होईल’

दरम्यान, जे आमचे लोक होते त्यांनी माघार घेतली आहे. जाधव, विसपुते यांनी माघार घेतली. सगळे रिंगणात आहेत. आता देवेंद्र फडणवीस आले की योग्य तो निर्णय होईल, अशी माहिती भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. महाविकास आघाडीचा उमेदवार कोण, आमचा पाठिंबा कोणाला हे काही सांगता येत नाही? उद्या काय होईल, देवेंद्रजी आल्यावर काय होईल काही सांगता येत नाही. त्रिशंकूसारखी परिस्थिती आहे. कोण कोणाकडे जाईल? कोण कोणाला पाठिंबा देईल? जोपर्यंत हे निश्चित होत नाही तोपर्यंत कोण किती प्रभावी ठरेल हे सांगणं कठीण आहे, असं गिरीश महाजन म्हणाले. सत्यजीत तांबे गोल्ड मेडल घेतील. पास होतील. पण भाजपने पाठींबा दिला तर. भाजप ज्याला पाठिंबा देईल तो डिस्टिंक्शन मध्ये पास होईल, असा दावा गिरीश महाजन यांनी केला.

सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई? दिल्लीतून काँग्रेस हायकमांडच्या सूचना

नॉट रिचेबल शुभांगी पाटील माध्यमांसमोर

महाराष्ट्रातील एकमेव महिला उमेदवारावर एकमेव काम करणाऱ्या व्यक्तीवर त्यांनी विश्वास टाकलेला आहे आणि ते विश्वास ठेवणार आहेत. मी महाविकास आघाडीतील सर्वांशी संपर्क साधलेला आहे. ठाकरे साहेबांकडे जाऊन भेट घेतलेली आहे. त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत, अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली.

शिर्डी विमानतळावर फडणवीस आणि विखेंमध्ये गुप्त चर्चा; सत्यजीत ताबेंबद्दल खलबतं?

अपक्ष अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल होत्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर शुभांगी पाटील या माध्यमांसमोर आल्या. शुभांगी पाटील यांना नॉट रिचेबाल होण्याचे कारण विचारले असता त्यांनी ते कारण वेळवर सांगेल, अशी प्रतक्रिया दिली. काहीतरी असल्याशिवाय नॉट रिचेबल होत नसतो. तसेच मला उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील, यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचं शुभांगी पाटील म्हणाल्या.

Source link

ahmednagar newsGirish Mahajannashik graduate constituencynashik graduate constituency electionnashik padvidhar matdar sangh electionsatyajeet tambesatyajeet tambe social media post viralshubhangi patil nashik
Comments (0)
Add Comment