वाशिम : मंगरुळपीर शहरात दादा हयात कलदंर यांच्या उरूस निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली होती. या रॅलीत औरंगजेबाचे फोटो घेऊन तरुण नाचत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे मंगरुळपीर शहरात तणावाचे वातवरण आहे.
मंगरुळपीरमध्ये दादा हयात कलदंर यांच्या उरूस दरम्यान काही तरुण औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचले. यावेळी औरंगजेबाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. काही तरुणांच्या हाती दादा हयात कलंदर यांच्या उरुसमध्ये औरंगजेबाचा फोटो दिसला. ही घटना १४ जानवेरीच्या रात्री घडली. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती मंगरुळपीरच्या पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.
बदलेची आग भडकली! जुन्या वाद डोक्यात ठेवून मित्रावरच वार, कॉलेजला जाताना केला घात
६० लाख हुंडा द्या, नाहीतर मुलगी चारित्र्यहीन असल्याचं सांगू, साखरपुड्यानंतर वरपक्षाची