भिवंडीत मांजाने बाईकस्वाराचा गळा कापला, कुटुंबाने एकुलता एक आधार गमावला

Thane Crime news | मकरसक्रांत जवळ येऊ लागताच मुंबईच्या आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग दिसू लागतात. पक्षी, प्राण्यांसह मनुष्याच्या जीवाला धोकादायक ठरणाऱ्या चिनी, प्लास्टिक आणि नायलॉन माजांच्या विक्रीला राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जाते. या मांजाची विक्रीही सर्रास केली जाते. त्यामुळे दरवर्षी दुर्घटना घडतात.

 

नायलॉन मांजा गळ्यात अडकून अपघात

हायलाइट्स:

  • संजय हजारे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते
  • गळा कापला गेलेल्या अवस्थेत संजय हजारे रस्त्यावर पडून होते
ठाणे: दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या मांजाने गळा कापल्याने उल्हासनगरच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी भिवंडीत घडला. या प्रकरणी भिवंडी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संजय हजारे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते उल्हासनगरमध्ये राहत होते. वाइन शॉपमध्ये काम करणारे संजय रविवारी सायंकाळी दुचाकीवरून वाडा येथून उल्हासनगरला निघाले होते. भिवंडीतील उड्डाणपुलावर आल्यानंतर येथील लटकणाऱ्या मांजाने त्यांचा गळा कापला गेला. ते रस्त्यावर पडले. जखम खोलवर झाली होती. रक्तप्रवाह अधिक झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ज्या मांजाने हजारे यांचा गळा कापला तो नायलॉनचा असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या गुन्ह्याची या पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात या येत आहे. नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची विक्री होतेच कशी, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

संजय हजारे हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे हजारे यांची पत्नी, मुले आणि वृद्ध पालक निराधार झाले आहेत. भिवंडी उड्डाणपुलावर अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. गळा कापला गेलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या संजय हजारे यांना तातडीने इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी संजय हजारे यांना मृत घोषित केले. संजय हजारे यांचा गळा कापला गेल्यानंतर ते बराचवेळ रस्त्यावर पडून होते. या काळात मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने आणि अन्य गंभीर दुखापतींमुळे हजारे यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.
शाळेतून घरी निघाली, दुचाकीवरुन येत असतानाच गळ्याभोवती मांजा फसला, ९ वर्षांच्या मुलीचा चिरला गळा

काही तासांपूर्वीच भिवंडी उड्डाणपुलावर दुर्घटना होता होता राहिली

पोलिसांनी याप्रकरणात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चार ते पाच लहान मुले या परिसरात पतंग उडवीत होती. हजारे यांचा गळा कापला गेलेला मांजा त्यांच्याच पतंगाचा असावा, असा संशय पोलिसांनी बोलून दाखवला आहे. संजय हजारे यांच्या अपघातापूर्वी काही तास आधीच भिवंडी उड्डाणपुलावर ऋषी केशरवानी या बाईकस्वाराचा अपघात झाला होता. मात्र, त्यांना किरकोळ खरचटण्यापलीकडे कोणतीही दुखापत झाली नव्हती. केशरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ ते भिवंडी उड्डाणपुलावरुन जात असताना त्यांच्या बाईकचा वेग कमी होता. तेव्हा त्यांच्याही गळ्यात नायलॉनचा मांजा अडकला. पण दुचाकीचा वेग कमी असल्याने त्यांनी गाडी वेळीच रोखली. त्यामुळे माझा जीव वाचला’, असे ऋषी केशरवानी यांनी सांगितले.
निष्पाप पाखरांवर ‘संक्रांत’; नाशिकमध्ये जखमी अकरांपैकी चार पक्ष्यांचा मृत्यू

बंदी असूनही नायलॉनचा मांजाचा मुक्तसंचार

मकरसक्रांतीचा सण असल्यामुळे पोलिसांनी पतंग उडवताना नायलॉनचा मांजा वापरण्यावर बंदी घातली होती. रविवारी रात्रीच भिवंडी पोलिसांनी प्रतिबंधित वस्तू विकणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई केली होती. त्यांच्यावर कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

bhiwadi local newsbikers thorat slit by nylon manjamaharashtra crime newsNylon Manjaroad accident in thanethane local newsनायलॉन पतंग मांजामांजाने गळा चिरला
Comments (0)
Add Comment