Maharashtra Politics | एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारल्यानंतर नितीन देशमुख हे सुरतला गेले होते. सूरत येथील हॉटेलमध्ये काही दिवस त्यांचा मुक्काम होता. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे नितीन देशमुख हे माघारी परतले होते. यानंतर नितीन देशमुख यांनी शिंदे गटाने आपल्या जबरदस्तीने सूरत येथील हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप केला होता.