लोकसभा तुम्हीच लढवा, काँग्रेसच्या तरुण नेत्यांची मागणी; सुशीलकुमार शिंदेंचा नवा लूक चर्चेत

इरफान खान, सोलापूर: माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना भाजपच्या नवख्या उमेदवारांनी दोनदा पराभूत करून धूळ चारली आहे.सोलापुरात काँग्रेसची उतरती कळा लागली असताना सुशीलकुमार शिंदेनी काही दिवसांपूर्वी आगामी लोकसभा निवडणुक लढवणार नाही, अशी घोषणा केली होती.तेव्हापासून २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा नवा उमेदवार कोण, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु, सोलापुरातील काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी लढाईपूर्वीच माघार घेत सुशील कुमार शिंदे यांनीच निवडणूक लढववी, असा आग्रह धरला आहे. सोलापूर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी सुशीलकुमार शिंदेंना भेटून निवेदन देत ही मागणी केली. यामागे सोलापूरात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नसल्याची हतबलता आहे का सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर तरुण काँग्रेस नेत्यांनी दाखवलेला खुशमस्करेपणा, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसकडे तरुण चेहरा उपलब्ध नाही का?

काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आज फक्त एक काँग्रेस आमदार आहे. एका आमदाराच्या जोरावर लोकसभा निवडणुक कशी जिंकणार असाही सवाल निर्माण होत आहे. निवेदन देणाऱ्या या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत काँग्रेस वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले, हे देखील पाहणे गरजेचे आहे. काँग्रेसकडे युवा चेहरा उपलब्ध नाही का?. ऐंशी वर्षांच्या सुशीलकुमार शिंदेच आगामी निवडणुकीत खासदार व्हा,तुम्हीच निवडणूक लढवा अशी मागणी करण्यामागे या पदाधिकाऱ्यांचं काय हित आहे,हे देखील पाहणे गरजेचे आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंचा वारसदार कोण?; नातू शिखर यात्रेत सोबत दिसल्याने चर्चा सुरू

गेल्या दहा वर्षांत काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी काय प्रयत्न केले?

राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय ऊर्जा मंत्री,केंद्रीय गृहमंत्री,व राज्यपाल राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेच्या जिल्ह्यात काँग्रेस एका आमदारापुरता मर्यादित राहिली आहे.सोलापूर शहर मध्यमधून सुशीलकुमार शिंदेंची कन्या प्रणिती शिंदे या एकच आमदार सोलापूर जिल्ह्यात आहेत.खुद्द सुशीलकुमार शिंदेना ,दोनदा पराभव पत्करावा लागला.दहा वर्षांपासून सोलापुरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीसाठी किती प्रयत्न केले हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवरून दिसून येते. दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार सुभाष देशमुख यांबद्दल अनेक मतदारांनी नाराजी व्यक्त केली होती. तरीही येथून भाजपचा आमदार निवडून आला.यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधीच सोनं करता आलं नाही. उत्तर सोलापूर मतदार संघातील भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांना पराभूत करणे,याच पदाधिकाऱ्यांना अशक्य झाले आहे.अक्कलकोट मतदार संघात भाजपच्या सचिन कल्याणशेट्टी या नवख्या उमेदवाराने अनुभवी सिद्धाराम म्हेत्रे यांना पराभूत केले.

एका आमदाराच्या जोरावर काँग्रेसचा खासदार कसा निवडून येणार?

एकएक करून भाजपने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर कब्जा केला आहे. फक्त काँग्रेसच्या एका आमदाराच्या जोरावर काँग्रेसचे पदाधिकारी सुशीलकुमार शिंदेंना कसे खासदार करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फक्त सहानुभूती मिळावी म्हणून ,एक केविलवाणे निवेदन दिले आहे की काय असे दिसून येत आहे.लिंगायत समाजाचे काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या जागी चेतन नरोटे यांना शहर अध्यक्षपदी बसवल्याने लिंगायत समाज दबक्या आवाजात काँग्रेस विरोधात चर्चा करत आहे.सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील मुस्लिम व दलित मतांना काँग्रेस पक्षातील नेते व पदाधिकारी कसे आपल्याकडे खेचून आणणार, हा मोठा प्रश्न आहे. कारण काँग्रेस मधील अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष क्वचितच कार्यक्रम घेतान दिसतात. महिला शहर अध्यक्ष देखील आंदोलनावेळी फक्त उपस्थिती दर्शवतात.
सुशीलकुमार शिंदेंनी मोबाईल चोराला रंगेहाथ पकडलं, दादर स्टेशनजवळ चोरीचा प्रयत्न

सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा दाढी काढली

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांच्या देहबोलीची चर्चा रंगली होती. तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांनी थकलेल्या आवाजात आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. शिंदेंच्या आवाजातून व त्याच्या दाढी न केलेल्या चेहऱ्यावरून ते पूर्णपणे थकल्याची चर्चा होती. परंतु, सोमवारी झालेल्या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंचा पूर्णपणे वेगळा लूक पाहायला मिळाला. या कार्यक्रमात ते तुळतुळीत दाढी करुन, शर्ट-पँट इन करुन आले होते. यावेळी त्यांनी हसतमुखाने काँग्रेसच्या तरुण पदाधिकाऱ्यांकडून निवेदन स्वीकारले.

Source link

Congresslok sabha election 2024Maharashtra politicssolapur local newsSolapur Lok Sabha constituencysushil kumar shindeसुशीलकुमार शिंदे लोकसभा निवडणूक
Comments (0)
Add Comment