मोठा भाऊ शिक्षकांचा आमदार, लहान भावाला पदवीधरच्या जागेचे वेध, भाजप काँग्रेसची अडचण वाढणार?

देव इंगोले ,वाशिम: महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली होती. त्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघावर वाशिमच्या किरणराव सरनाईक यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराचा पराभव करत किरण सरनाईक आमदार बनले होते. आता नागपूर शिक्षक, औरंगाबाद शिक्षक आणि कोकण शिक्षक मतदारसंघासह अमरावती आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. किरण सरनाईक अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर आता त्यांचे भाऊ अरुण सरनाईक विधानपरिषदेच्या रिंगणात उतरले आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात धक्कादायक निकाल लागणार का याकडे पाहावं लागणार आहे.

सरनाईक यांना विजयाची आशा

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी राज्यात निवडणूक होऊ घातली आहे. काल अनेकांनी उमेदवारी माघारी घेतल्या नंतर आता लढतीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार डॉ.रणजित पाटील तर महाविकास आघाडी कडून धीरज लिंगाडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र, या प्रमुख उमेदवारांसह एकूण २३ उमेदवार पदवीधरच्या निवडणुकीत आहेत. ज्यामध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष आमदार अॅड. किरण सरनाईक यांचे धाकटे बंधू अरुण सरनाईक हे देखील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. शिक्षक निवडणुकीत झालेल्या मतदानाची पुनरावृत्ती होईल, अशी अपेक्षा सरनाईक यांना आहे.

कल्याणमध्ये इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग, आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू

दोन वर्षा पूर्वी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत प्रचारात चर्चेत नसलेले किरणराव सरनाईक हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. तशीच किमया पदवीधर निवडणुकीत होईल असा विश्वास त्यांच्या धाकट्या बंधूंना आहे. अमरावती शिक्षक महासंघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पदवीधरांची मतदार नोंदणी केली असल्याचा दावा अरुण सरनाईक यांनी केला आहे.

सत्यजीत तांबेंचा पक्षाला धक्का, नाना पटोले यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात?

अरुण सरनाईक हे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठया शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. शिवाय वाशिम नगर परिषदेचे उपाध्यक्षही राहिले आहेत. सरनाईक यांना अपेक्षित असलेला चमत्कार खरंच घडणार की भाजप कॉग्रेसच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. मात्र, प्रमुख पक्षाच्या उमेदवारांवर नाराजी असलेल्या वाशिमच्या मतदारांना सरनाईकांच्या रूपाने नवा पर्याय सापडल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे.

ब्रिटनने १८ कोटी भारतीयांचा जीव घेतला, संपत्ती, अन्नधान्य लुटले; रशियाने गंभीर आरोप करत डिवचले

Source link

amravati graduate electionamravati graduate election newsarun sarnaikBJP newscongress newskiran sarnaikMaharashtra politicsmlc election 2023washim newswashim news today
Comments (0)
Add Comment