विधिमंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरणासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनाही आमंत्रित केले आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.
आमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचं नाव नाही
महाराष्ट्र विधानमंडळाकडून हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचा अनावरण सोहळा २३ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे. तर, आमंत्रक म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांची नावं आहेत. या पत्रिकेत उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख प्रोटोकॉल प्रमाणं टाळण्यात आला आहे.
होय, आम्हीच त्याला संपवलं, घरात पुरलं! चिमुकल्याचा जीव घेऊन सासू सुनांची कबुली; पोलीस सुन्न
उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना आमंत्रण
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारी रोजी विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विधानमंडळ सचिवालयाकडून ठाकरे कुटुंबीय म्हणून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांना दुसरी आमंत्रण पत्रिका पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता प्रसाद ओक करणार असल्याची माहिती आहे.
मोदींच्या स्वागताला सेना भवनासमोर CM शिंदेंचा फ्लेक्स, काही तासाच फ्लेक्स हटवला, कारण…
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती बाबत अनिश्चितता
विधानमंडळात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात असलं तरी ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, यासंदर्भातील माहिती समोर आलेली नाही.
राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत मोठा भाऊ शिक्षक आमदार बनला, लहान भावाला अमरावती पदवीधरमध्ये विजयाची आशा