पेट्रोलपंपाच्या बाजूला आयशर गाडी उभी होती, भल्या पहाटे आतील दृश्य पाहून लोकांची घाबरगुंडी उडाली

जालना : आज मंगळवारी पहाटे औरंगाबाद चौफुली परिसरात सिंधू पेट्रोलपंपावर उभा असलेल्या आयशर गाडीमध्ये दोरीच्या सहाय्याने एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघड झाली. या तरुणाने फाशी घेतल्याने त्याचा गाडीतच लटकलेला देह पाहून हे दृश्य पाहणाऱ्या लोकांची एकच घाबरगुंडी उडाली. आयशर गाडीच्या छताला दोरी बांधून त्यात गळा फसवून घेतल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

शेख कलीम उस्मान शेख असे या तरुणाचे नाव आहे. तो जालना शहरातील संजयनगर भागातील रहिवासी आहे. शेख कलीम शेख उस्मान याचा जीव गेल्यानंतर त्याचा देह गाडीतच लटकलेला होता. गाडीच्या मागील बाजूचे तप्पड उघडून पाहिल्याने हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर ही गोष्ट परिसरात वेगाने पसरल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली होती. घटनास्थळी जमाव जमा झाल्यावर कोणीतरी याची माहिती पोलिसांना कळवली.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती, उद्याच होती परीक्षा, विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला खाली उतरवले. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ब्रिटनने १८ कोटी भारतीयांचा जीव घेतला, संपत्ती, अन्नधान्य लुटले; रशियाने गंभीर आरोप करत डिवचले

अनेकांच्या अंगावर उभा राहिला काटा
शेख कलीम शेख उस्मान याने गाडीमध्ये फाशी घेत असा टोकाचा आत्महत्येचा निर्णय का घेतला, याबद्दल काहीच माहिती उपलब्ध झालेली नाही. पण घटनास्थळावरील दृश्य पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. या तरुणाने आत्महत्या केली तरी कशामुळे याबाबत लोक चर्चा करू लागले असून घडलेल्या प्रकारानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- छप्पर फाडके! यावर्षी होणार घसघशीत वेतनवाढ; पाहा, कोणत्या सेक्टरमध्ये किती वाढणार कर्मचाऱ्यांचा पैसा

Source link

Dead body in carDead body of a youthEicher carआयशर कारकारमध्ये आढळला मृतदेहजालना
Comments (0)
Add Comment