शहरातील सर्वात जास्त वाहतूक होणाऱ्या अकोला नाका ते हिंगोली नाका या रस्त्याच्या दुरुस्तीची गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक मागणी करत होते. खड्डेमय झालेल्या याच मार्गाने शहरातील सर्वात जास्त वाहतूक होते. कारण हिंगोली, अकोला, अमरावती, पुसदकडे जाणारे सर्व अवजड वाहने याच मार्गाने जातात. अनेक वाहनाचे अपघात झाल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले. मात्र हे काम घाई गडबडीत होत असून त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे काम सुरू असतानाच त्यावरून वाहतूकही सुरू आहे. त्यामळे केलेले काम लगेच उखडले जात आहे.
वाचाः रत्नागिरीत सिलिंडरच्या स्फोटानंतर भीषण आग, शेजारील घरांनाही तडे; दोन महिलांचा मृत्यू
काल दुपारी डांबरीकरण झालेला हिंगोली नाक्यावरील रस्ता आज पूर्णपणे उखडला आहे. डांबरीकरण करतांना रस्त्याची लेव्हल काढली गेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे तसेच राहिले आहेत. बऱ्याच प्रतीक्षेनंतर होत असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या नशिबी खड्डेच येण्याची शक्यता आहे. त्यामळे प्रशासनाने या कामाकडे लक्ष देऊन चांगल्या दर्जाचा रस्ता बनवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाचाः बापाची भेट शेवटचीच ठरली! लेकीला भेटून वडिलांनी निरोप घेतला पण वाटेतच काळाने गाठले