काल बापटांना रुग्णालयातून डिस्चार्ज, आज कसब्याची निवडणूक जाहीर, कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या तब्बेतीत सुधारणा झाल्यानंतर गिरीश बापट यांना डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळताच गिरीश बापट यांनी कसब्यातील कार्यालय गाठलं. गिरीश बापट कार्यलयात आले आहेत हे कळताच कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ या घोषणेने परिसर अक्षरशः दणाणून निघाला होता. गिरीश बापट यांची पुणे भाजपात असलेली ताकद सर्वश्रूत आहे. अशातच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात रिक्त झालेल्या जागेवर उमेदवारीसाठी भाजपमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. अशात गिरीश बापट आजारी असताना देखील त्यांच्या स्वागताला उसळलेली गर्दी बापट यांची ताकद दाखवून देत होती.

खासदार बापट हे गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना श्वसनाचा त्रास आहे. ते आजारी असल्यामुळे सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. गेल्याच महिन्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि महिन्याभरात संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे संसदेत भेटू, अशा शब्दात पवार यांनी बापट यांना धीर दिला होता.

दरम्यान, खासदार बापट हे आजारी पडल्यानंतर काल पहिल्यांदाच सुमारे दीड महिन्यानंतर कसबा कार्यालयात आले होते. ते कार्यालयात येणार याची कुणालाच कल्पना नव्हती. ते नेहमीप्रमाणे जसे कार्यालयात यायचे आणि ज्या ठिकाणी बसायचे तेथेच येऊन बसले होते. दरम्यान, अचानक बापट कार्यालयात दिसल्याने कार्यकर्त्यांना मोठा आनंद झाला. ही बातमी लगेच कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि कार्यकर्त्यांनी बापटांच्या संपर्क कार्यालयाकडे धाव घेतली.

बापट यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे ते आपल्या घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र अजूनही ऑक्सिजनची श्वसन नलिका त्यांना लावलेली आहे. असे असूनही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी कसबा कार्यालय गाठलं आणि भेटलेल्या कार्यकर्त्यांची नेहमीप्रमाणे विचारपूस केली. यामुळे कार्यकर्ते कमालीचे आनंदी झाले होते.

मुक्ता टिळक यांच्या निधनांनंतर कसबा विधानसभा मतदारसंघात येत्या 27 फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. त्याच पार्शवभूमीवर गिरीश बापट यांचे अशापद्धतीने पुन्हा सक्रिय होणे म्हणजे कसबा विधानसभा मतदार संघात अजूनही गिरीश बापट यांचाच शब्द अंतिम असेल असेच सुचवू पाहत आहेत.

Source link

bjp leader girish bapatdinanath mangeshkar hospitalgirish bapatgirish bapat dischargegirish bapat join bjp officeगिरीश बापटगिरीश बापट डिस्चार्ज
Comments (0)
Add Comment