मार्गामुळे मुंबईकरांना वाहतुककोंडीतून दिलासा मिळणार आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर व दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ या प्रकल्पाच्या मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्याचा प्रवास लवकरच सुरू होत आहे. या दोन्ही मार्गिका पूर्ण रूपात सुरू होत असताना सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेची तसेच इंधनाची मोठी बचत यामुळे आता होणार आहे.
मेट्रो २ अ मार्गिकेचा दहिसर पूर्व ते डहाणूकरवाडी व मेट्रो ७ चा दहिसर पूर्व ते आरे, हा पहिला टप्पा एप्रिलमध्येच सुरू झाला. आता मेट्रो २ अ चा वळनई ते अंधेरी पश्चिम तर मेट्रो ७ चा गोरेगाव पूर्व ते गुंदवली, असा दुसरा टप्पा सुरू होत आहे. दोन्ही मार्गिकांचा हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना एका दिशेने सलग १६ ते १८ किलोमीटरची संलग्नता मिळणार आहे.
हा टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना गुंदवली (अंधेरी पूर्व) ते अंधेरी पश्चिम अशी एकूण ३५ किलोमीटरची कमानीच्या स्वरूपातील मेट्रो मार्गिका दहिसरमार्गे मिळू शकणार आहे. यापैकी एका मार्गिकेचा एक भाग हा साधारण १६ किलोमीटर लांबीचा असून त्याचे कमाल तिकीट ३० रुपये असेल.
दहिसर ते अंधेरी
मेट्रो २ अ मार्गिकेवर दहिसर पूर्वपासून ते अंधेरी पश्चिम हा पूर्ण प्रवास लवकरच करता येणार आहे. साधारण १८ किलोमीटर लांबीच्या या प्रवासाचे तिकीट ३० रुपये असेल. त्यासाठी जवळपास ३५ ते ४० मिनिटे लागतील. सध्या रस्तामार्गे हा प्रवास करण्यासाठी अनेकदा एक तासाहून अधिक वेळ लागतो.
दहिसर ते गुंदवली
मेट्रो ७ मार्गिकेवरून दहिसर पूर्व ते गुंदवली, असा पूर्ण प्रवास करता येईल. जवळपास १५ किमी लांबीच्या या प्रवासाचे तिकीट ३० रुपये असून त्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतील. सध्या रस्त्यावरुन हा प्रवास करण्यासाठी एक ते सव्वा तास कधी दीड तासांचा अवधी लागतो.