दर्ग्यावर लावलेल्या झेंड्याला समजले पाकिस्तानचा झेंडा; हिंदू भक्ताने लावलेला झेंडा पोलिसांनी केला जप्त

जळगाव : एमआयडीसी हद्दीतील विटनेर गावाजवळ असलेल्या एका दर्ग्याच्या ठिकाणी एक झेंडा लावलेला होता. हा झेंडा पाकिस्तानच्या झेंड्या प्रमाणे असल्याची माहिती ग्रामस्थ तसेच विटनेर गावाचे पोलीस पाटील यांना मिळाली. त्यानुसार ग्रामस्थ आणि पोलीस पाटलांनी घटनास्थळ गाठून हा झेंडा काढून घेतला. तसेच दर्ग्यावरील एका व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

झेंड्यावरील वादावरून संबंधितावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. मात्र, हा पाकिस्तानचा झेंडा नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ग्रामस्थांची समजूत घातली. तसेच या झेंड्यामुळे पुन्हा अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून हा झेंडा जप्त करण्यात आला आहे. तर ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला समज देण्यात आली आहे.

पोलिसांनी एका हिंदू व्यक्तीला घेतले ताब्यात

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विटनेर म्हणून एक गाव आहे. या गावापासून अर्ध्या किमी अंतरावर एक दर्गा आहे. पाकिस्तानच्या झेंड्यासारखा दिसणारा झेंडा फडकत असल्याची माहिती देण्यात आली होती. या प्रकरणी तपास करण्यात आला. गोपाळ सुपडू कहार नावाच्या एका हिंदू व्यक्तीने जो नेरी जामनेर इथला राहणारा आहे त्याने तो लावला होता, असं समजलं. त्यानंतर गोपाळ कहार याला आणून त्याची चौकशी करण्यात आली. बाबा स्वप्नात आले आणि म्हणून मी तो झेंडा लावला. पण तो पाकिस्तानचा झेंडा आहे किंवा तसा दिसणारा झेंडा आहे याची आपल्याला माहिती नाही, असं गोपाळ कहार यानं चौकशीत सांगितलं. त्यानंतरही आम्ही त्याची सखोल चौकशी करत आहोत. पण त्या झेंड्याचं प्रत्यक्षात स्वरुप पाहिलं असता त्या झेंड्याला सफेद किनार आहे. अशी कुठलीही सफेद किनार पाकिस्तानच्या झेंड्याला नाही. त्यामुळे तो पाकिस्तानचा झेंडा आहे, असं म्हणता येणार नाही. पण तसाच दिसणारा हा झेंडा आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी दिली.

भरधाव दुचाकी स्पीडब्रेकरवरुन उडाली, भिंतीवर आदळली; जळगावात दोन मित्रांचा करुण अंत

अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांचा कारवाईचा इशारा

विटनेर गावात पाकिस्तानी झेंडा, असं सांगून सोशल मीडियात काही पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे सत्य नाहीए. तो फक्त हिरवा आणि पांढऱ्या रंगाचा झेंडा आहे. तो पाकिस्तानचा झेंडा नाहीए. त्यामुळे कुणीही अशा पोस्ट व्हायरल करू नये. आणि अफवा पसरवू नये. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस निरीक्षक हिरे यांनी दिला आहे.

जळगावात मद्यपी वाहन चालकाचा माज, पाच दुचाकींना उडवलं; नागरिकांकडून कपडे

Source link

Hindu Devotee Planted Flag On The Dargahjalgaon midc police seized flagjalgaon newspakistan national flagthe flag planted by a hindu devoteethe flag planted by a hindu devotee on the dargah
Comments (0)
Add Comment