लघुशंका करताना हटकलं, तरुणासोबत बाचाबाची, बेपत्ता वृद्धाच्या मृत्यूचं गूढ सहा दिवसांनी उलगडलं

परभणी : लघुशंका करत असताना हटकल्यावरुन वृद्धाने शिवीगाळ केली. त्यामुळे झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून तरुणाला राग अनावर झाला. अखेर त्याने वृद्धाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात नवीन बलसा शिवारामध्ये घडली आहे.

दिलीप लक्ष्मण वैद्य (राहणार लोकमान्य नगर, परभणी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर धनंजय रमेशराव मानदळे असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी नवा मोंढा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

परभणी शहरातील लोकमान्य नगरमध्ये राहणारे दिलीप लक्ष्मणराव वैद्य हे ११ जानेवारीपासून घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांकडे त्यांचा शोध घेतल्यानंतरही ते आढळून न आल्याने १२ जानेवारी रोजी ऋषिकेश वैद्य यांच्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

त्यानंतर १४ जानेवारी रोजी दिलीप वैद्य यांचा मृतदेह नवीन बलसा शिवारामध्ये कॅनॉलमध्ये आढळून आला होता. शव विच्छेदनाच्या अहवालामध्ये दिलीप वैद्य यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथकाची निर्मिती केली होती. मात्र आरोपीने कुठलाही पुरावा न सोडल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान होते. अशातच पोलीस तपास करत असताना १७ जानेवारी रोजी हा खून परभणी शहरातील आशीर्वाद नगर येथील धनंजय रमेशराव मानदळे याने केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

हेही वाचा : जुन्या भांडणाचा राग लेकरावर काढला, अंगणातून उचलून जीव घेतला, सासू-सून जोडगोळी अटकेत
त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दिलीप वैद्य हे कॅनलजवळ लघुशंका करत होते, त्यामुळे आपण त्यांना हटकले असता त्यांनी शिवीगाळ केल्याने शाब्दिक बाचाबाचीनंतर राग मनात धरून गळा दाबून त्यांचा खून केला असल्याची कबुली आरोपी धनंजय रमेशराव मानदळे याने दिली आहे. या घटनेचा अधिक तपास नवा मोंढा पोलीस करत आहेत.

हेही वाचा : खेळताना विजेच्या खांबाला हात लागला, आठ वर्षांच्या मुलाचा तडफडून मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

Source link

maharashtra crime newsold man murderparbhani crime newsparbhani murderscuffle over urinatingज्येष्ठ नागरिक खूनपरभणी वृद्ध खूनपरभणी हत्यालघुशंका केल्यावरुन शिवीगाळ
Comments (0)
Add Comment