आधी शिव्या दिल्या, आता ओव्या गायल्या, बारामतीत जाऊन सत्तार म्हणाले, पवारांची पॉवर…

बारामती : राष्ट्रवादीच्या संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरून वादाच्या आणि चुकीचा शब्द उच्चारूनही त्याचं समर्थन केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना आता उपरती झाली आहे. बारामती येथे जाऊन सत्तार यांनी संपूर्ण पवार कुटुंबियांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यामुळे आधी शिव्या देणाऱ्या सत्तारांच्या तोंडी अचानक ओव्या कशा आल्या? अशी कुजबूज ऐकायला मिळाली.

बारामतीमधील माळेगाव येथे एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषिमंत्री सत्तार बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार उपस्थित होते.

आधी शिव्या दिल्या, आता ओव्या गायल्या!

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापासून खासदार सुप्रियाताई सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रोहित दादा पवार हे सगळेच नेते चांगले आहेत. काम करणारे आहेत. पवारांची पॉवर अशीच कायम राहो, अशी प्रार्थना करतो, असे उद्गार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढले.

बारामतीत कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रात झालेला विकास पाहून कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रभावित झालेले पाहायला मिळाले. बारामतीत विकास बघायला मिळाला. पवार कुटुंब काम करणारं आहे. त्यांची पॉवर अशीच राहो, अशा मनोकामना सत्तार यांनी व्यक्त केल्या.

मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही. मंत्रालयात मंत्री भेटत नाहीत, कोणत्या मंत्र्याकडे कोणता खाते आहे, हे सामान्यांना अद्याप माहिती नाही, अशी टीका विरोधक करतायेत. या आरोपावर बोलताना सत्तार म्हणाले, आरोप करणे हे विरोधकांचे काम असते. वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांना वेगवेगळी जबाबदारी असते. आज मी बारामतीत आहे. त्याच वेळी माझ्या कार्यालयात कोणी गेले तर मी त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री विभागाचे काम करत असतात. मतदार संघातील काम आठवड्यातील तीन दिवस आम्ही करतो तसेच मंत्रालयातही आम्ही तीन दिवस असतो, अशी सारवासारव सत्तार यांनी केली.

मंत्रिमंडळ विस्तार कधी? सत्तारांचं एका वाक्यात उत्तर

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतील तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल.

Source link

Abdul SattarAbdul Sattar in baramatiabdul sattar praises supriya suleagricultural exhibitionagriculture devlopement trust baramatiagriculture minister abdul sattarअब्दुल सत्तारबारामती कृषी प्रदर्शनसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment