सिद्धेश्वर महायात्रेत पैशांवरुन झालेला वाद टोकाला; भयानक प्रकार पाहून पोलीस हादरले

सोलापूर : सोलापूरमध्ये सिद्धेश्वर येथील महायात्रेत दुकानदारांमध्ये जबर हाणामारी झाली आहे. यामध्ये एका तरुण दुकानचालकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर तीन दुकानधारक गंभीर जखमी झाले आहेत. आज गुरुवारी दुपारी २ ते ३ दरम्यान कॉस्मेटिक दुकानदारांमध्ये अचानक हाणामारी झाली. हाणामारीचे रुपांतर हत्येत झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिकसाह अख्तरसाह (वय २१, रा. मु.पो.डुमरी जि. कैंम्हूर, बिहार) या तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली आहे. तबरेजसाह, आदिलसाह, परवेजसाह हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

व्यवसायाच्या होत असलेल्या स्पर्धेतून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. भर यात्रेत हत्या झाल्याची बातमी पसरताच भाविकांची पळापळ झाली. क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब तपास करत अक्कलकोट येथून चार जणांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मेट्रो ते बुलेट ट्रेन, पीएम स्वनिधी, मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकलं,मोदींच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

मयत अतिकसाह यांच्या भावाने शासकीय रुग्णालयात माहिती देताना सांगितलं की, “आम्ही दरवर्षी सोलापुरातील गड्डा यात्रेत कॉस्मेटिकचे मालाचं दुकान लावतो. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील सिद्धेश्वर महायात्रेत दुकान लावलं आहे. बाजूच्या दुकानदाराकडून जवळपास १६ हजार रुपयांचे कॉस्मेटिक माल उधारीवर घेतला आहे. त्यातील ८ हजार रुपये उधारी देण्यात आली आहे. पण शिल्लक राहिलेल्या ८ हजार रुपयांसाठी दोन दिवसांपासून वाद सुरू होता. आज गुरुवारी दुपारी मोठा वाद झाला आणि बाजूच्या दुकानातील तीन तरुण हातात चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन आले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली” आणि यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे ,m..

गड्डा यात्रेत एका तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फौजदार चावडी स्टेशनच्या पोलिसांनी मत अतिकसाहचा मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून महिती घेतली असता संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेतलं असून सर्व तपास करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतात मुलींनी जन्मच घ्यायला नको जर… विनेश फोगटने वाचला ब्रिजभूषण यांच्या अन्यायाचा पाढा

Source link

Solapur Crime Newssolapur local newssolapur marathi newssolapur siddheshwar yatra murder newsसोलापूर क्राईम बातम्यासोलापूर मराठी बातम्यासोलापूर लोकल बातम्यासोलापूर सिद्धेश्वर यात्रा हत्या बातमी
Comments (0)
Add Comment