काँग्रेसनं गरिबांच्या, सामान्यांच्या पोरांसाठी शिक्षण व्यवस्था निर्माण केली. भाक्रा नांगल प्रकल्प उभारला, सार्वजनिक उपक्रमातून काँग्रेसनं देश उभा केला. पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी ज्या संस्था उभ्या केल्या त्या विकून नरेंद्र मोदी देश चालवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्रातील राज्यपाल, मंत्री यांच्याकडून महापुरुषांच्या अपमानाचं काम झालं त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम मोदींनी केलं, असं नाना पटोले म्हणाले.
सहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन झालं होतं. त्याबद्दल नरेंद्र मोदी काही बोलले नाहीत, असं नाना पटोले म्हणाले. भाजपनंज्या पद्धतीनं दिल्लीला कचरा केला ते पाहिलं आहे. दिल्लीच्या तीन महापालिका भाजपच्या ताब्यात होत्या, दिल्लीच्या जनतेनं भाजपला साफ केलं. दिल्लीत भाजपची गत झाली ती मुंबईत होणार आहे, असं नाना पटोले म्हणाले.
नरेंद्र मोदी मुंबईच्या विकासावर बोलताना ते स्वत:ला दोष देत होते का, असा सवाल नाना पटोले यांनी केला. गेले २५ वर्ष भाजप शिवसेनेबरोबर सत्तेत होता. आपल्याच लोकांनी मुंबई घाण केली, असं म्हणायचं का? असा सवाल नाना पटोले यांनी मोदी यांना केला आहे.
महाराष्ट्राच्या तिजोरीतील पैसा तुमच्या कार्यक्रमावर खर्च झाला, मोठमोठ्या जाहिराती देण्यात आल्या. जनतेची लूट झाली पण महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यामुळं मोदींच्या आवाहनाला महाराष्ट्राची जनता दाद देणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.
सिद्धेश्वर महायात्रेत पैशांवरुन झालेला वाद टोकाला; भयानक प्रकार पाहून पोलीस हादरले; पाहा काय घडलं
नरेंद्र मोदी मुंबईला आणि महाराष्ट्राला काय देऊन गेले. महागाईवर काय बोलले नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर ते काय बोलले नाहीत. महाराष्ट्राच्या मोदींकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, असं नाना पटोले म्हणाले.
तुम्ही १० पावलं चाला मी ११ पावलं चालण्यास तयार, पंतप्रधान मोदींनी BMC निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
करोना काळात महाविकास आघाडी सरकारनं लोकांचे जीव कसे वाचतील यासाठी काम केलं. जागतिक पातळीवर आमच्या कामाची दखल घेतली गेली. त्यामुळं आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं नाना पटोले म्हणाले.
विनेश फोगटने दिले ब्रिजभूषण सिंग यांना खुले आव्हान, म्हणाली ‘दोन मिनिटांत पर्दापाश करणार’
पंतप्रधान हे पंतप्रधान म्हणून वावरताना दिसत नाहीत, अरविंद सावंतांची टीका