देवळाली गाव येथे असलेल्या गांधी चौक परिसरात शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत शिंदे आणि ठाकरे गटात राडा झाला असून अज्ञाताने यावेळी हवेत गोळीबार केला आहे. दरम्यान, शिवजयंतीच्या नियोजन बैठकीवेळी ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाल्याने हा गोळीबार झाल्याचे सांगितलं जात आहे. शिंदे गटाने शिवजयंतीच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.
विनेश फोगटने दिले ब्रिजभूषण सिंग यांना खुले आव्हान, म्हणाली ‘दोन मिनिटांत पर्दाफाश करणार’
त्याचवेळी ठाकरे गटानेही त्याच ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं. बैठकीदरम्यान दोन्ही गट आमने-सामने आल्यानं वाद झाला. वाद निर्माण झाल्यानंतर एका अज्ञाताने हवेत गोळीबार झाल्याची प्रत्यक्षदर्शनींनी माहिती दिली आहे. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी घटनेची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली आहे.
गोळीबार झाल्यानंतर देवळाली परिसरात काही काळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये देखील प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी दंगा नियंत्रण पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आल्याचे म्हटलं जात आहे.
शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून शहरात सलग दोन दिवस दोन हत्या घडल्या आहेत. तर नाशिकच्या गजबजलेल्या परिसरात काही टवळखोरांनी वाहनांची व दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे. तसेच नाशिकच्या सातपूर परिसरात देखील काही अज्ञात टोळक्याने आठ ते दहा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आज पुन्हा देवळाली गाव परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अठराव्या वर्षी तरुणीला मिळाला ‘हात’; मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; देशात पहिल्यांदाच घडला चमत्कार