एकनाथ शिंदेंनी सभेत काय सांगितलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसच्या परिषदेतील एक प्रसंग आजच्या सभेत सांगितला. “लक्झमबर्गचे पंतप्रधान मला दावोसमध्ये भेटले. ते म्हणाले मी मोदींचा भक्त आहे. माझ्यासोबत फोटो काढला आणि म्हणाले मोदीजींना हा फोटो दाखवा”, असं शिंदे यांनी सांगितलं. यापुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी जर्मनी आणि सौदी अरेबियाचे प्रमुख लोकसुद्धा मोदींबद्दल विचारत होते, असंही म्हटलं.
एकनाथ शिंदे यांनी लक्झमबर्गच्या पंतप्रधानांचा किस्सा सांगताच तो चर्चेचा विषय ठरला. लक्झमबर्ग हा देश नेमका कुठं आहे, असा अनेकांना प्रश्न पडला. तर, लक्झमबर्ग हा देश वायव्य यूरोपमध्ये आहे. या देशाला पश्चिम आणि उत्तरेकडून बेल्जियम, दक्षिणेकडून फ्रान्स तर ईशान्य आणि पूर्वेकडून जर्मनीची सीमा लागलेली आहे.
विनेश फोगटने दिले ब्रिजभूषण सिंग यांना खुले आव्हान, म्हणाली ‘दोन मिनिटांत पर्दाफाश करणार’
लक्झमबर्गची अर्थव्यवस्था ही इतर यूरोपियन देशांसोबतच्या व्यापारावर अवलंबून आहे. लोखंड आणि स्टील उद्योग हा प्रमुख उद्योग आहे. देशातील बहुतांश निर्यात लोखंड आणि स्टीलची होते. हा देश यूरोपियन यूनियनचा देखील सदस्य आहे. लक्झमबर्गमधील राजकीय व्यवस्था ही जवळपास इंग्लंडप्रमाणं आहे. लक्झमबर्गमध्ये चार वर्षांपूर्वी तिथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जनतेसाठी मोफत करण्यात आली होती.
राखी सावंतची जामिनावर सुटका, माणुसकी दाखवत केली नाही अटक
लक्झमबर्गचे पंतप्रधान हे झेवियर बेटेल असून ते २०१३ पासून पंतप्रधानपदावर कार्यरत आहेत. झेवियर बेटेल गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. तर, पंतप्रधान होण्यापूर्वी त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. लक्झमबर्ग शहराचे ते महापौर देखील राहिले आहेत.बेटेल हे डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्य असून ते वकील देखील आहेत. लक्झमबर्ग या देशाची २०२१ च्या आकडेवारीनुसार लोकसंख्या ६ लाख ४० हजारांच्या दरम्यान आहे.
शिंदे समर्थकांचा हस्तक्षेप वाढला, थेट धमकी देतात, काम करणं अवघड झालंय, आरोग्य कर्मचाऱ्यांची CEO कडे तक्रार
लक्झेमबर्गचे पंतप्रधान भेटले अन् म्हणाले मैं मोदीजी का भक्त हूं : एकनाथ शिंदे