घरात उमेदवारी मिळावी ही सर्वांची इच्छा, कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीय उत्सुक

पुणे : भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला संधी देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्यातच आता टिळक कुटुंबातून याविषयी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कसब्यात लढण्यासाठी भाजपमधून इच्छुकांची भाऊगर्दी असताना आता थेट टिळक कुटुंबातूनच पुन्हा या जागेवर दावा ठोकण्यात आलाय.

पक्षाने संधी दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांच्यानंतर आमचाच घरात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे. पण उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय शेवटी पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मुक्ता टिळकांनी अनेक वर्ष या परिसरात चांगलं काम केलं आहे. मुक्ता टिळकांचं मतदार संघासाठी काम पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी हीच आमची इच्छा, असं शैलेश टिळक म्हणाले आहेत.

दरम्यान, जर पक्षाने संधी दिली तर नक्कीच मी ही निवडणूक लढणार आहे. मी अनेक वर्ष मुक्तांसोबत काम केलेल आहे, कुणाल देखील चांगलं काम करत आहे. त्यामुळे आम्हालाच उमेदवारी मिळावी, असं देखील शैलेश टिळक म्हणाले आहेत. दुसरीकडे कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे धीरज घाटे, गणेश बिडकर, हेमंत रासने यांचे देखील नावं चर्चेत आहेत.

अशात आता टिळकांच्या घरातूनच ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजप नेतृत्व नक्की काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, भाजपकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली, तर टिळक कुटुंबातील सदस्याला विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. आणि कसब्यात निर्णायक मतदार असणाऱ्या ब्राह्मण समाजाला पुन्हा एकदा प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला जाणार आहे.

हेही वाचा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसची उडी, गिरीश बापटांना घाम फोडणारा नेता आव्हान देणार?

पण ही निवडणूक बिनविरोध नाही झाली तर काय करायचे, याबाबतही भाजपच्या प्रदेश नेतृत्वांमध्ये चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास भाजप टिळकांच्या घरात उमेदवारी देणार की पक्षातील इतर इच्छुकांमधून कोणाची निवड करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा : अमरावती पदवीधर : धीरज लिंगाडेंना मविआचं तिकीट, माजी गृहराज्यमंत्र्यांना भिडणार

Source link

kunal tilakMaharashtra Political Newsmukta tilakmukta tilak husbandpune kasba peth bypollshailesh tilakकुणाल टिळकपुणे कसबा पेठ पोटनिवडणूकमुक्ता टिळकशैलेश टिळक
Comments (0)
Add Comment