सोलापुरात व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी, ५० कोटींचे बोगस व्यवहार समोर

सोलापूर : सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मुळेगाव रोडवरील सोनांकूर एक्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या बीफ एक्स्पोर्ट कंपनीसह आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोडवरील भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने सोमवार ते गुरुवार असे चार दिवस छापे टाकले आहेत. या छाप्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.

तब्बल चार दिवस एकाच वेळी अचानकपणे धाडी पडल्या होत्या. व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना काही समजण्याअगोदर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली आहे. करचोरी करणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांच्या विरोधात कारवाई करत रोखीने व कच्च्या कागदांवर झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली आहेत.

सोलापूर शहरातील भंगार व्यवसायिकांवर कारवाई

आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध रुग्णालयांवर छापेमारी करत शंभर कोटींवर घबाड जप्त केले होते. या कारवाईत शहरातील रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली होती. शहरातील रुग्णालयावर झालेल्या कारवाईत 100 कोटींचा गैरप्रकार समोर आला होता. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली. या व्यावसायिकांनी भंगार, साहित्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने खरेदी करत टॅक्स चोरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : सिकंदरने मैदान गाजवलं; सांगलीतील कुस्तीत पंजाबच्या पैलवानाला लोळवत ५ लाखांचं बक्षीस जिंकलं

५० कोटी रुपयांची तफावत आढळून आली

सोलापुरात झालेल्या कारवाईत व्यावसायिक व व्यापारी यांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांची तफावत आढळून आली आहे. भंगार विक्रेत्यांनी खरेदी दर कमी दाखविले आहेत. आयकर अधिकाऱ्यांनी कच्च्या नोंदी असलेली कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. रोखीच्या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर करचोरी झाली आहे. ही करचोरी कधीपासून झाली, या करचोरीमध्ये इतर कोण-कोण सहभागी आहेत याची तपासणी सुरू आहे.

हेही वाचा : बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहण्याची शक्यता

Source link

income tax raidmaharashtra crime newsSolapur Crime Newssolapur income tax raidआयकर विभाग छापाइन्कम टॅक्स छापेमारीसोलापूर आयकर विभाग धाडसोलापूर आयटी धाड
Comments (0)
Add Comment