अध्यक्षपदावरुन वाद, शिंदे-ठाकरे गटात राडा, माजी नगरसेवकाच्या मुलाचा हवेत गोळीबार

नाशिक : नाशिकमध्ये काल रात्री गोळीबाराची घटना उघडकीस आली होती. शिवजयंतीच्या आयोजनावरून सायंकाळच्या सुमारास देवळाली गाव परिसरात बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदावरुन सुरू असलेल्या चर्चेत ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला. त्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी असलेले माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे यांचा मुलगा स्वप्नील लवटे याने बंदूक काढत हवेत गोळीबार केला होता. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संशयित स्वप्नीलला ताब्यात घेतले असून उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या चालू आहे.

काल देवळाली येथील गांधी चौक परिसरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान अध्यक्ष पदाच्या निवडीवरून शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. यावेळी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा, शिंदे गटाचे नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजू लवटेंचा यांचा पुतण्या स्वप्नील लवटे याला राग अनावर झाला आणि त्याने कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला आहे. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा : मराठवाडा शिक्षक मतदारसंघ : राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंना धक्का, विश्वासू सहकारी भाजपात

दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्यात प्रत्यक्षदर्शी आणि तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून स्वप्नील लवटे याला पोलीसांनी अटक केली आहे. तर या प्रकरणाचा अधिकचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्राकांत खांडवी यांनी दिली आहे. काल रात्री गोळीबार झाल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस आणि दंगल नियंत्रण पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

हेही वाचा : नाशिकमध्ये १८ लाखांचा रस्ता चोरीला गेला, शोधून देणाऱ्याला पाच लाखांचे बक्षीस जाहीर, पण…

Source link

gun fire in airmaharashtra crime newsnashik crime newsnashik ex corporator son firingshinde thackeray camp ruckusएकनाथ शिंदे गटनाशिक माजी नगरसेवक मुलगा गोळीबारमाजी नगरसेवक मुलगा हवेत गोळीबारशिंदे गट नगरसेवकशिंदे ठाकरे गट राडा
Comments (0)
Add Comment