नवले पुलावर अपघातांचं सत्र सुरुच; भरधाव डंपरची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यातील नवले पुलावर भूमकर चौक येथे एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. भरधाव निघालेल्या डंपरने एका दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिल गोविंद राठोड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. डंपरचा चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर पुलाकडून हायवेकडे जाणाऱ्या सर्विस रोडवर, ग्रॅडूप सोसायटीसमोर अशोक लेलँड कंपनीचा डंपर (एम एस ४६ बीएम ०१५१) जात होता. भरधाव वेगाने निघालेल्या डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघाता झाला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी सांगितला आहे.

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी भरती, जाणून घ्या तपशील

नवले पूल आणि भूमकर चौकात अपघातांचं सत्र संपायचं नाव घेत नाहीये. काही महिन्यांपूर्वी नवले पुलावर तब्बल ३२ गाड्या एकमेकांना धडकल्यानंतर जणू काही अपघाताची मालिका सुरू झाली आहे. एका आठवड्यात नवले पूल आणि भूमकर चौकात किरकोळ आणि मोठे असे १५ ते २० अपघात सलग झाले आहेत. यानंतर प्रशासनाला तातडीने जाग आली आणि अनेक ठिकाणी अपुरी असलेली काम पूर्ण करण्यात आली.

तरी देखील भूमकर चौकापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्याची काम अद्याप प्रलंबित आहेत. सर्विस रोडपासून मेन हायवेच्या कनेक्टिंग पॉईंटमध्ये कोणतेही दुभाजक नाही. यामध्ये हायवेवर रस्ता दुरुस्तीची काम सुरू असल्यामुळे ट्रॅफिकला कंटाळून चालक वेगाने वाहन चालवतात. त्यातच आज मुख्य हायवेवरून जात असताना भरधाव वेगात असणाऱ्या डंपरच्यामध्ये एक दुचाकीस्वार अचानक आल्याने त्याला डंपरचा धक्का लागला आणि नियंत्रण सुटल्याने डंपर त्याच्या अंगावरून गेला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

Ranji Trophy: क्रिकेटमध्ये झाला ऐतिहासिक रेकॉर्ड; फक्त इतक्या धावात झाला ऑलआउट

Source link

Pune crime newspune navale bridgepune navale bridge accidentpune navale bridge dumper and bike accidentपुणे क्राईम बातम्यापुणे नवले पुलपुणे नवले पुल अपघातपुणे नवले पुल डंपर आणि बाईक अपघात
Comments (0)
Add Comment