पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. यातील विवाहित महिला पूजा संतोष आडे (रा. गुत्तीतांडा) हिचे गावातीलच संतोष पांडू आडे यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर त्यांना सिद्धार्थ (वय२ वर्ष ) हा मुलगा व पुंदी (वय ४ महिने) ही मुलगी झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी संतोष आडे हा हैदराबाद (तेलंगणा) येथे कामासाठी गेला होता. संतोष हा बुधवारी गावी परत आला होता. यानंतर तो हैदराबादला कामाला परत निघाला होता. संतोष याने माझ्या मुलीला सोबत घेऊन जावे, या कारणावरून पूजाचे वडील नारायण सखाराम राठोड यांचा संतोष व संतोषचे वडील पांडू आडे यांच्यासोबत वाद झाला. या वादातून दोन्ही गटाकडून मारहाणही झाली. यात पांडू आडे यांना जबर दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बायकोसाठी तो सकाळी सकाळीच पाण्याच्या टाकीवर चढला, पोलीस आणि अग्निशमन
आपल्या आई-वडिलांना पत्नी पूजाच्या आई-वडिलांनी मारहाण केल्याने पती संतोष हा संतापला. मरखेल पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तो गेला. पती संतोष पोलीस ठाण्यात गेल्याचे कळाल्यानंतर पूजाचा राग अनावर झाला. पती आपल्यासह आपल्या आई-वडिलांची तक्रार पोलीस ठाण्यात करतोय हे समजतात पूजाला राग आवा. रागाच्या भरात पूजाने आपला २ वर्षीय मुलगा सिद्धार्थ आणि ४ महिन्याची मुलगी फंदी या दोघांना स्वतःच्या वडिलांच्या शेतातील विहिरीत फेकून दिले.
आणि स्वतः विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सदरील विहिरीत पाणी कमी असल्याने ती बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. मरखेल ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्यासह पोलीस जमादार अब्दुल बारी, चंद्रकांत पांढरे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी निर्दयी पूजावर मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने पूजाविरोधात रोष तर मुलांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
Nanded News: हाडांची भुकटी, सडलेल्या मांसाची प्रचंड दुर्गंधी; बिलोली परिसरात