बायकोसाठी तो सकाळी सकाळीच पाण्याच्या टाकीवर चढला, पोलीस आणि अग्निशमन दलाची धावाधाव

नांदेड : बायको नांदायला येत नाही म्हणून एका तरुणाने चक्क पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. देविदास येरगे ( वय ३२ ) असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण नांदेड शहरातील आंबानगर येथील रहिवासी आहे. देविदास येरगे आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबीक वाद सुरू होता. याच वादातून त्याची पत्नी मुलाबाळासह माहेरी गेली. सहा महिन्यांपासून त्याची पत्नी माहेरी आहे.

पत्नीला वारंवार विनंती करूनही त्याची पत्नी नांदायला काही येत नव्हती. अखेर वैतागलेल्या देविदास याने पत्नीसाठी शोले स्टाइल आंदोलन केले. देविदास हा शुक्रवारी सकाळी सात वाजता शोभानगर येथील पाण्याच्या टाकीवर चढला. पत्नीला नांदायला बोलवा अन्यथा खाली उडी मारून आत्महत्या करतो, अशी धमकी देखील देविदास देत होता. देविदास याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो मजुरीचं काम करतो.

Nanded News: हाडांची भुकटी, सडलेल्या मांसाची प्रचंड दुर्गंधी; बिलोली परिसरात रोगराईचे साम्राज्य

देवीदास याच्या आंदोलनाची माहिती कळताच विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल ७ तास देविदासने पत्नी परत यावी यासाठी शोले स्टाइल आंदोलन केले. अखेर पाण्याची बॉटल देण्याच्या बहाना करत विमानतळ पोलिसांनी त्या तरुणाला पकडून सुखरुप खाली आणले. आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, या तरुणाचे हे आंदोलन पाहण्यासाठी सकाळपासूनच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

भावाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं; नांदेडमधील १३ वर्षीय लक्ष्मीला राष्ट्रीय बाल शौर्य

Source link

husband sholay style protest in nandedhusband sholay style protest in nanded for wifenanded newsnanded news todayshobha nagar nandedsholay style protest in nanded
Comments (0)
Add Comment