महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत टांग कोणी कोणाला मारली यावरून गेली काही दिवस चर्चेचा धुरळा उडाला आहे. त्याच्यामध्ये कधी अंगाला माती न लावलेले, कधी लंगोट न घातलेले, आखाड्यात शड्डू न ठोकलेले बिना लंगोटचे पहिलवानच आघाडीवर होते. जे खेळ करतात त्यांनीच याबद्दल अधिकार वाणीने बोलावे असं माझं मत आहे. आमच्यासारख्याने फक्त तोंडाची वाफ वाया घालण्याचं अजिबात कारण नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या रक्तातच ही गोष्ट नाही; ते फक्त सोन्याच्या चमच्यानं ज्यूस पिऊन मोठे झाले- बावनकुळे
अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्ह्याचे सुपुत्र असणाऱ्या हिंदकेसरी पै.अभिजित कटके व महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघांनाही ०२ नवीन बुलेट व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं आहे. तसेच उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड याचा देखील यावेळी सन्मान यावेळी करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे.
अवघ्या ७ महिन्यात आयुष्याची राख रांगोळी; ६ लाखसााठी नवविवाहितेला मारहाण, अखेर…
पवार पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच उत्तर भारतातील मल्लांना पराभवाचं पाणी पाजणारा सिकंदर शेख हा देखील लढवय्या मल्ल आहे. त्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी केली आहे. माझी विनंती आहे की सिकंदर वरून काही जण समाजात विनाकारण द्वेषाचा राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. खेळाला जातीय स्वरूप देऊ नये. प्रत्येक मल्लाच धर्म हा कुस्ती असतो त्यामुळे जाती पातीचं लेबल लावून खेळाला बदनाम करु नये, असं देखील यावेळी पवार म्हणाले.
न्यूझीलंडसाठी व्हिलन ठरलेली खेळपट्टी होती तरी कशी, भारतासाठी या दोन गोष्टी ठरल्या टर्निंग पॉइंट