जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या सुरेश कस्तुरे यांनी आपल्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली. आणि एक मोठा निर्णय घेतला. शिक्षक कस्तुरे यांच्या एका निर्णयाने संपूर्ण गावाचा प्रश्न सुटला आहे.
शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी आपली जमीन इंझाळा ग्रामपंचायतीला दान दिली आहे. आपल्या गावातील लोकांना पिण्यासाठी दुरवरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे लोकांना होत असलेला त्रास पाहून शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी मोठा निर्णय घेतला. कस्तुरे यांनी आपल्या शेतजमिनीवरील विहीर व मोटर पंपचे घर खोदकाम व बांधकाम करीता २५०० चौ. फुट जागा ग्रामपंचायत इंझाळा यांना दान दिली. शेतातील विहीर व जागेवर माझा यापुढे कोणताही अधिकार व हक्क राहणार नाही. तसेच वरील शेतावर माझे शिवाय इतर वारसांचा हक्क संबंध नाही. ते मी याआधी कोणास कोणत्याही प्रकारे गहाण, दान बक्षीस करून दिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसे काही निघाल्यास त्यास मी जबाबदार राहील. तसेच वरील विहीर व जागा ग्राम पंचायत इंझाळा यांना दान दिली असून त्या विहीरीवर व दिलेल्या जागेवर माझा यापुढे कोणत्याही प्रकारे काहीही संबंध राहणार नाही व माझा हक्क संपुष्टात आला असून मी यापुढे त्या विहीर व जागेबाबत कोणतीही तक्रार वा हरकत करणार नाही, असे दानपत्र शिक्षक कस्तुरे यांनी राजीखुशीने लिहून देवून साक्षसमक्ष समजावून घेवून व वाचून घेवून त्यावर सही केली. ती मला व माझे संपत्ती वारसास लागू व बंधनकारक असल्याचेही दानपत्रात त्यांनी लिहून दिले आहे.
संजय राठोडांना मोठा धक्का, २५ वर्षांपासून साथ देणाऱ्या सहकाऱ्यानं जिल्हाप्रमुखपद सोडलं, शिंदे गटात खदखद
सुरेश कस्तुरे हे गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी ३० फूट खोल विहीर खोदली होती. या विहिरीला भरपूर पाणी लागले. विहीर खोदण्यासाठी आणि तिचे बांधकाम करण्यासाठी एकूण ३ लाख खर्च आला. आता विहिरीसह तिच्या आजूबाजूची अजीच हजार स्केअरफूट जागाही त्यांनी गावासाठी दान दिली. आई-वडिलांच्या शिकवणीतून आपण हा एक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक सुरेश कस्तुरे यांच्या कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वत्र दानशूर शिक्षक सुरेश कस्तुरे यांचे कौतुक होत असल्याचे चित्र दिसत आहे.
खिचडी केव्हा मिळणार?; लाखों विद्यार्थ्यांचा सवाल, महिनाभरापासून पोषण आहाराचा