एकाच स्टॅम्प पेपरवर झाले दोन करार; बीएमसी घोटाळ्याबाबत किरीट सोमय्या यांचा दावा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याबाबत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धक्कादायक माहिती समोर आणली आहे. करोनाकाळात झालेल्या १०० कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीत सहआयुक्त सुनील धामणे यांनी अहवाल सादर केला असून यात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल केले आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. तर एकाच स्टॅम्प पेपरवर दोन करार झाल्याचा दावाही त्यांनी शनिवारी मुंबईत केला. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेतील घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. करोनाकाळातील घोटाळ्याबाबत सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने चौकशी करण्यास सांगितली होती. पालिकेच्या तत्कालीन नेत्यांनी दोन सदस्यांची समिती नेमली. सहआयुक्त सुनील धामणे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. महापालिकेने ६ एप्रिल २०२२ रोजी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. जून २०२२मध्ये या समितीने अहवाल दिला, असे सोमय्या यांनी सांगितले.

या अहवालात भ्रष्टाचार झाल्याचे कबूल करण्यात आले आहे. पण कोणतीही कारवाई करू नये, अशी शिफारस करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणी सुनील धामणे यांचीच चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली. या अहवालात लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस ही कंपनी अस्तित्वात केव्हा आली, यावर महापालिकेने कायदेशीर सल्ला मागितला होता. त्यावर विधी विभागाने सल्ला दिला. या कंपनीची नोटरी बनावट आहे, असे विधी विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रात भागीदारी करार करणे कायद्याने बंधनकारक आहे, असेही विधी विभागाने नमूद केल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Source link

bmc scamKirit SomaiyaMumbai Municipal Corporationmumbai newssunil dhamane
Comments (0)
Add Comment