अमरावती : धामणगाव रेल्वे तळेगाव दशासर येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या गावातीलच एक २३ वर्षीय तरुणाने काही दिवसांपासून तरुणीला त्रास देत होता. मंगळवारी दुपारीही शंकरपटाच्या यात्रेतही त्याने संबधित तरुणीला हातवारे केले. त्याच्या याच त्रासाला कंटाळूनच अल्पवयीन तरुणीने आत्महत्या केल्याची तक्रार तरुणीच्या वडिलांनी तळेगाव दशासर पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. दरम्यान, पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
तौफिक शेख हाफिज शेख (२३, रा. तळेगाव दशासर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका १७ वर्षीय तरुणीला मागील काही दिवसांपासून त्रास देत होता. तौफिक त्रास देत असल्याचे एक महिन्यांपूर्वी तरुणीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. त्यानंतर तरुणीचा चुलत भाऊ तसेच मामांनी त्याला समजावून सांगितले होते. त्यावेळी त्याने यापुढे त्रास देणार नसल्याचे सांगितले होते.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंभुर्डे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास संबधित तरुणी महाविद्यालयातून घरी आल्यानंतर गावातच सूरू असलेल्या शंकरपटाच्या यात्रेत गेली होती. या यात्रेत तरुणीच्या मागे मागे तौफिक शेख फिरत होता. त्याने या तरुणीला इशारेसुद्धा केले. ही बाब तरुणीच्या चुलत भावाने पाहिली. त्यामुळे त्याने तौफिकला हटकले. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद सुद्धा झाला.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अल्पवयीन तरुणीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. तौफिकच्या त्रासामुळेच मुलीने हे पाऊल उचलले, अशी तक्रार तरुणीच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी तौफिक शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रसंतांचा महाकाय पुतळा; २० फुट उंच आणि १५ फूट रुंद अन् ५ टनाचा भव्य स्टॅच्यू