मुंबई नाशिक महामार्गवरील सापे गाव येथे बिलाल मोहंमद शेख या २२ वर्षीय तरुणाचे चिकन शॉपचे दुकान आहे. बिलाल हा भिवंडी तालुक्यातील वडवली गावात कुटूंबासह राहतो. दुकान बंद करून बिलाल हा मित्रासह मुंबई – नाशिक महामार्गवरील सागर ईन या हॉटेलमध्ये १८ जानेवारी रोजी रात्रीच्या जेवणासाठी आला. त्यावेळी त्याच हॉटेलमध्ये हल्लेखोर भावेश हा देखील जेवण करत होता. जेवण झाल्यावर बिलाल जेवणाचं बिल देण्यासाठी हॉटेलच्या काउंटरवर येताच संधी साधत हल्लेखोर भावेशने बिलालच्या कमरेत चॉपर खुसपला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिलाल जीव वाचविण्यासाठी हॉटेलच्या आवारात आला. इथेही त्याच्यावर भावेशने चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्याचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
भरधाव कार ५० फूट खोल दरीत कोसळणार; तितक्यात चमत्कार घडला, निसर्ग मदतीला धावला
झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात बिलाल हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेदरम्यान बिलालच्या मित्राने भरधाव कार हल्लेखोराच्या दिशेनं आणल्याने तो बाजूला झाला. बिलालचा मित्र सर्फराज याने बिलालला पडघा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. १९ जानेवारी रोजी बिलाल शुद्धीवर आल्यानंतर त्याने पडघा पोलिसांना जबाब देऊन हल्लेखोर भावेश विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. पडघा पोलिसांनी हल्लेखोर आरोपी भावेश वामन बेलवले याला अटक केली आहे. भावेश हा भिवंडीतील डोहाळेगाव येथे राहणार आहे.
या प्रकरणी पडघा पोलिसांनी भावेशला अटक करून पुढील चौकशी केली असता हल्लखोर भावेशचा मोठा भाऊ अमोल याला पाच वर्षांपूर्वी बिलाल आणि त्याचा मित्र हरिशने मारहाण केली होती. तेव्हापासून मारहाणीचा राग मनात भावेशच्या मनात होता. त्याच रागातून भावेश हा बिलालला मारण्यासाठी टपून बसला होता आणि संधी मिळताच त्याने बिलालवर जीवघेणा हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सध्या बिलालवर भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर पडघा पोलिसांनी हल्लेखोर भावेशला अटक करून कायदेशीर प्रक्रिया पार पाडत आहे. अधिक तपास पडघा पोलीस करत आहेत.
राष्ट्रसंतांचा महाकाय पुतळा; २० फुट उंच आणि १५ फूट रुंद अन् ५ टनाचा भव्य स्टॅच्यू