शिवनेरी जुन्नर (पुणे) : महाराष्ट्र केसरी किताब मिळविल्यानंतर पैलवान शिवराज राक्षे याने शिवनेरीवर येवून शिवस्फूर्ती घेतली. शिवजन्मस्थळी नतमस्तक झाल्यानंतर एकच वेगळीच स्फूर्ती आणि उर्जा मिळाल्याचे त्याने ‘मटा’ला सांगितले. आता पुढील लक्ष्य ऑलिंपिकचे असून, एशियन गेम्ससाठी देखील शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन स्फूर्ती घेऊन जात असल्याची भावना त्याने व्यक्त केली. किल्ले शिवनेरी(ता.जुन्नर) शिवजन्मस्थळी नतमस्तक होत महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने शिवरायांचे दर्शन घेतले. महाराष्ट्र केसरी किताब मिळालेली गदा घेऊन शिवजन्मस्थानी शिवराज राक्षे आणित्याचे कुटुंबिय आले होते.
शिवराजचे संपुर्ण कुटुंबिय आज शिवनेरीवर उपस्थित होते. महाराष्ट्राचे कुस्ती चॅम्पियन पैलवान बाळू बोडके, शिवराजची आई सुरेखा राक्षे, ज्येष्ठ बंधू युवराज राक्षे, संदिप राक्षे, रज राक्षे, नवनाथ राक्षे, आदींनी गडावर येवून बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या चरणी लिन होत,अभिवादन केले.

मी शिवरायांचा मावळा आहे, याचा मला अभिमान आहे. कुस्ती खेळात लढवय्येगिरीने लढण्याची प्रेरणा मी शिवाजी महाराजांकडूनच घेतली आहे. महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर येथे येऊन खूप ताकत मिळाल्याची भावना व्यक्त करताना महाराष्ट्राचा लौकिक असाच सातासमुद्रापार नेईल, अशी ग्वाही शिवराजने दिली.
आईच्या डोळ्यात आनंदाश्रू…
माता जिजाऊंचे दर्शन घेताना, आई म्हणाली जिजाऊंनी शिवरायांना घडविले, तसेच शिवराजला घडविण्याचे बळ मला मिळायला पाहिजे, या भावना मनोमन व्यक्त करताना आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा क्षण माझ्यासाठी खूपच हद्य आणि चैतन्यउर्जा देणारा होता, अशा भावना शिवराज राक्षेच्या आईने मटाशी बोलताना व्यक्त केल्या.