मुंबई-दिल्ली महामार्ग हा पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे. नितन गडकरी यांनी महामार्गाचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी प्रगतीचा महामार्ग, गतीशक्ती असे हॅशटॅग देखील वापरले आहे. गडकरींनी शेअर केलेले फोटो हे विरार-वडोदरा या टप्प्यातील महामार्गाचे आहेत. हे फोटो पाहून महामार्ग भव्य-दिव्य असेल याच प्रचितीच येतेय. येत्या वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याची शक्यता आहे
वाचाः मुंबईकरांना मोठा दिलासा! लवकरच मिळणार स्वस्त वीज; टाटा, अदानींकडून दरकपातीचा प्रस्ताव
कसा असेल महामार्ग
दिल्ली आणि मुंबई यांना जोडणारा हा एक्सप्रेसवे जगातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे ठरणार असल्याचं म्हटलं जातंय. हा महामार्ग पाच राज्यांना जोडतो. गुजरात (४२६ किमी), राजस्थान (३७३ किमी), मध्य प्रदेश (२४४ किमी), महाराष्ट्र (१७१ किमी), हरयाणा (१२९ किमी) आणि दिल्ली (९ किमी) या राज्यांचा समावेश आहे. रस्ते मार्गानं मुंबई ते दिल्ली हे अंतर कापण्यासाठी कमीत कमी २४ तास लागतात. मात्र, हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास केवळ १२ तासांत पूर्ण करता येईल. या प्रकल्पात आठ लेन असून दोन आयकॉनिक बोगद्यांचाही समावेश आहे.
वाचाः शालेय मित्राने घात केला! मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध अन् मारहाणही; अखेर मित्राने उचललं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय महामार्ग पूर्व-पश्चिम कॉरिडोरचा एक भाग आहे. या महामार्गाची लांबी १३८६ किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी ९० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तसंच हा एक्सप्रेस ‘ग्रीन एक्सप्रेस – वे’ असेल. या महामार्गाच्या दोन्ही बाजुंनी वृक्षारोपण करण्यासाठी शालेय मुलांना प्रोत्साहीत केलं जाणार आहे.
वाचाः कामानिमित्त आईबाप दिल्लीला, दोन मुलींना काकाजवळ ठेवलं, त्यानेच घात केला, मित्राला बोलावून हादरवणारं कृत्य