VIDEO: ‘तेव्हा बाळासाहेबांना समजलं होतं, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा!’

मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त आज सर्वपक्षीय नेते मंडळी कार्यक्रमाच्या माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करत आहेत. याचपार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मनसे अधिकृत या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत राज ठाकरेंच्या भाषणातील एक छोटासा भाग असून शिवसेना सोडतानाच बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीचा एक किस्सा आहे.

मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. तर, व्हिडिओसोबत राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांसोबत अखेरचा ‘राज’कीय संवाद, असं कॅप्शन दिलं आहे. राज ठाकरे पक्ष सोडताना बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्याच्यात झालेलं संभाषण राज ठाकरे यांनी एका सभेत सांगितलं होतं. त्याच सभेतील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मनसेनं ट्विट केली आहे.

वाचाः भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवलाय; बाळासाहेबांच्या जन्मदिनी शिंदेंवर जहरी टीका
काय आहे व्हिडिओत

‘मला आजही ती गोष्ट आठवते. जेव्हा बाळासाहेबांना कळलं हा काही राहत नाही आता पक्षात. माझी शेवटची भेट होती. या आधी मी कधी बोललो नाही तुमच्याशी ही गोष्ट,’ असं म्हणत राज ठाकरेंनी त्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. ‘मी निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होती. मनोहर जोशी खोलीच्या बाहेर गेले. तेव्हा माननीय बाळासाहेबांनी मला बोलावलं. माझ्यासमोर हात पसरले माझ्यासमोर मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा, त्यांना समजलं होतं,’ असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

वाचाः शिवसेना-‘वंचित’ युतीची अधिकृत घोषणा होण्याचे संकेत; उद्धव ठाकरे आज भाष्य करणार
‘या राज ठाकरेने बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून बाहेर पडलो आहे. त्यामुळं दगाफटका करुन, गद्दारी करुन, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो. आणि बाहेप पडू दुसऱ्या कोणत्या पक्षात नाही गेलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला,’ असं राज ठाकरेंनी पुढे नमूद केलं.

Source link

balasaheb thackerayBalasaheb Thackeray birth anniversarybalasaheb thackeray jayantiraj thackerayraj thackeray and balasaheb thackerayबाळासाहेब ठाकरे जयंतीराज ठाकरे
Comments (0)
Add Comment