Authored by आदित्य भवार | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Jan 2023, 10:08 am
Maharashtra Political News: अजित पवार हे आपल्या मतांवर आणि वक्तव्यांवर ठाम राहण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादी गोष्ट पचनी पडली नाही तर जागच्या जागी सर्वांदेखत संबंधित व्यक्तींना खडसावताना अजितदादा मागेपुढे पाहत नाहीत. परंतु, वेळ पडल्यास आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि प्रेम करणाऱ्या लोकांसाठी अजित पवार किती मृदू होऊ शकतात, याचा प्रत्यय शनिवारी पुण्यात आला.
हायलाइट्स:
- सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांना हारतुरे स्वीकारण्यास आवडत नाही
- अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमातील प्रसंग
काल अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या कार्यक्रमाला आले असताना कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एस के डी ग्रुप च्या कार्यालयाला भेट दिली. अजित पवार हे कार्यालयात आल्यानंतर सुभाष गव्हाणे यांची तीन वर्षीय क्रीतिका हिने त्यांचे औक्षण केले. औक्षण करताना तिने अजित पवार यांच्या कपाळावर कुंकू लावले. अजित पवार यांना कुंकवाची एलर्जी असल्यामुळे ते सुरुवातीला थोडेसे बिचकले. मात्र, नटुनथटून आलेल्या चिमुरडीला पाहून अजित पवार विरघळले आणि त्यांनी कोणतेही आढेवेढे न घेता कपाळावर कुंकू लावून घेतले. यानंतर या चिमुरडीने अगदी पारंपरिक पद्धतीने अजित पवार यांना ओवाळले. हा छोटेखानी सोहळा एकूणच पाहण्यासारखा होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमातही असाच मजेशीर प्रसंग घडला होता. यावेळी एक कार्यकर्ता अजित पवार यांना टोपी घालण्यासाठी आला. तेव्हा अजित पवार यांच्या मिश्कील टिप्पणीने एकच हशा पिकला होता. अजित पवार म्हणाले की, ‘टोपी घाला आम्हाला. आतापर्यंत कोणी नाही घातली, तुम्ही घाला, असे अजितदादांनी म्हटले.
चांगला अभ्यास करा रे, अजितदादांचा विद्यार्थ्यांना सल्ला
मध्यंतरी अजित पवार हे सांगली दौऱ्यावर होते. यावेळी अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. तासगाव तालुक्यातील गव्हाण गावच्या जिल्हा परिषद शाळेला अजित पवारांनी भेट दिली. यावेळी, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल कौतुक करत अजितदादांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिला. तेव्हा अजित पवार यांनी विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.