२१ जानेवारीला रात्री त्यांच्यापैकी जिया खान आणि सोनू मानकर हे दोघे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांनी काम आटोपले आणि जेवण करून इमारत परिसरात फिरायला निघाले. या नवीन इमारतीच्या बाजूलाच पार्किंग शेडचे काम देखील सुरू होते.
क्लिक करा आणि वाचा- स्पाइसजेटच्या विमानात एअर होस्टेसशी प्रवाशांचं गैरवर्तन, दोघांना खाली उतरवले, पाहा व्हिडिओ
रात्रीच्या सुमारास पार्किंग शेडचे काम करणाऱ्या मजूर नवीन इमारतीच्या प्रवेशदारावर कुलूप लावून होते. त्यामुळे कुलुपाची चावी देण्यावरून दोन्ही मजूरांमध्ये वाद निर्माण झाला. त्यात पार्किंग शेडचे काम करणाऱ्या मजुरांनी जिया खान याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने जिया खान याचा मृत्यू झाला.
क्लिक करा आणि वाचा- करोनानंतर आता नोरोव्हायरसने वाढवले टेंशन, कसा पसरतो हा आजार, जाणून घ्या लक्षणांपासून उपचारापर्यंत सर्व काही
पोलिसांनी ४ मारेकऱ्यांना घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रूग्णालयातील नवीन इमारत गाठून पाहाणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता पाठविला. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी असलेला मजूर सोनू मानकर (राहणार- टालपुरा, नागपूर) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत चार मारेकऱ्यांना ताब्यात घेतले.
क्लिक करा आणि वाचा- चर्चमधील कथित सेक्स पार्टीचा झाला खुलासा, ब्रिटनपासून व्हॅटिकनपर्यंत खळबळ, धर्मगुरूविरोधात चौकशी सुरू
ज्या ४ मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांमध्ये आकाश राठोड (२८), सोनू उर्फ धनराज कळसकर (२२), कमलेश कळसकर (३४), दत्ता कळसकर (५०) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बुलढाण्यातील आहेत. ही कारवाई शहर ठाणेदार नंदकुमार पंत यांच्या मार्गदर्शनात शहर डिबी पथकाने पार पाडली.