शाळेतून घरी जात होत्या, स्पीडब्रेकरवर दुचाकी आदळली अन् रस्त्यावर पडल्या, शिक्षिकेचा करुण अंत

रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढू लागलं आहे. असाच एक दुर्दैवी अपघात खेड तालुक्यात घडला आहे. यामध्ये एका शिक्षकेने आपले प्राण गमवावे लागले आहेत. खेड आंबवली मार्गावरील कुडोशी येथील स्पीड ब्रेकरवर मोटार सायकल आदळून झालेल्या अपघातात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा दुर्दैवी अंत झाला. सुषमा निकम (५५) असे या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. हा अपघात आज सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडला.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार मोहाने जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षिका सुषमा निकम या शाळा सुटल्यानंतर एका दुचाकीच्या मागे बसून आपल्या भरणे बाईतवाडी येथील घरी परतत होत्या. त्यांची दुचाकी कुडोशी येथे गतिरोधकावर आदळल्याने मागे बसलेल्या निकम या उंच उडून रस्त्यावर आदळल्या.

हेही वाचा -पैशांचा पाऊस पडेल, अल्पवयीन मेहुणीवर आठ महिने अत्याचार; नागपुरात दाम्पत्याला अटक

या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची खबर मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी मृत झालेल्या निकम यांच्या मृतदेहाचा पंचनामा करुन त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. अपघात होऊन एका शिक्षिकेचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा -वृद्धाचं निधन, अंत्यसंस्काराला गर्दी जमली; अग्नी देताच मधमाशांचा हल्ला, ग्रामस्थांची पळापळ…

रविवारी हळदीकुंकाहून परत असलेल्या खेड तालुक्यातील देवघर मार्गावरती छोट्या रिक्षा टेम्पोच्या झालेल्या अपघातात तब्बल १२ महिला जखमी झाल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यात हा दुसरा मोठा अपघात झाला आहे. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरती झालेल्या अपघाताची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घेतली असून त्यांनी सोमवारी तातडीने जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोकणातल्या मुंबई-गोवा महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी तातडीने सूचना फलक बसवण्याचे आदेश दिले आहे.

हेही वाचा -२६० किलो सोनं, ६,६०५ किलो चांदी, शेकडो एकर जमीन; गुरुवायुर मंदिराची श्रीमंती पाहून चक्रावून जाल

Source link

bike accident in ratnagirifemale teacher lost lifeRatnagiri accidentRatnagiri newsteacher accidentteacher death ratnagiriTeacher Died In Accidentरत्नागिरी न्यूज
Comments (0)
Add Comment