धुळे: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी नदी पुलावर हे भीषण अपघात झाला आहे. येथे मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर फुटल्याने क्रुझर पुलावर पलटी झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाचा तोल जाऊन अवजड वाहन पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळल्याची घटना आज रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात ५ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. पण, जे वाहन तापी नदीत पडलं त्याबाबत अद्याप कुठलीही माहिती नाही. त्यामध्ये किती जण होते याबाबतही अद्याप माहिती नाही, त्यामुळे या अपघाताची भीषणता वाढली आहे.
वैजापूर येथून MP 09 FA 6487 क्रमांकाची क्रुझर ही मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील शेंधवाकडे जात असताना मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावर क्रुझरचा टायर फुटला. यामुळे क्रुझरचा समतोल बिघडल्याने यावेळी मागून येणाऱ्या अज्ञात अवजड वाहनाचा तोल गेला. त्यानंतर वाहन तापी पुलाचे कठडे तोडून तापी नदीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे.

या अपघातात ५ जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात चारचाकी क्रुझर वाहन हे तापी पुलावर पलटला असून या क्रुझरमधील मजूर गंभीर जखमी झाले आहेत. पण, जे वाहन नदीत पडलं त्याबाबत अद्या कुठलीही माहिती नाही.
या सर्व ५ गंभीर जखमींवर शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. या पुलावर अंधार असल्याने तापी नदीत या भीषण अपघातात कोसळणारे वाहन नेमके कोणते आहे. याबाबत अद्याप ठोस माहिती मिळू शकलेलं नाही. मात्र, घटनास्थळी पुलाचे कठडे तुटल्याचे निदर्शनास येत आहे. घटनास्थळी शिरपूर शहर आणि नरडाणा पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातात पुलावरुन कुठले वाहन तापी नदी पात्रात कोसळले आहे याचा शोध आता पोलीस आणि गावकरी करीत आहे.