आतापर्यंत ऑनलाईनच्या विक्रीसाठी फसवणूक करणारे वेगवेगळ्या जाहिराती दाखवून नागरिकांना आमिष दाखवतात. आपल्याकडील ऑनलाईन वस्तू लोकांनी खरेदी करावी यासाठी वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून लोभ दाखवून नागरिकांची फसवणूक केलेली आपण आत्तापर्यंत पाहिली आहे. मात्र बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात कारी गावातील ज्ञानेश्वर दगडू फरताडे यांनी फेसबुकवर आलेल्या जाहिरात पाहून आपल्या शेतात काम करण्यासाठी बैलजोडी बुक केली. मात्र बौलजोडी बुक केल्यानंतर त्याला वेगवेगळे कारण देत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याकडून जवळपास ९५ हजार रुपये मागितले. हा सगळा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याने नेमका समोरील व्यक्ती कोण हे शेतकऱ्याला माहीती नव्हतं.
वाचाः सिनेमाला लाजवेल असा बुलढाण्यात दरोडा; १ कोटींच्या दरोड्याची उकल अखेर झालीच
९५ हजार दिल्यानंतर बैल जोडीची मागणी शेतकऱ्यांनी अनेक वेळा अज्ञात व्यक्तीकडे केली. मात्र उडवा उडवीच्या उत्तरानंतर शेतकऱ्याला आपली फसवणूक झाल्याचं उघडकीस आलं. मात्र अशा पद्धतीने ऑनलाईन विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत या कंपन्याद्वारे ऑनलाईन खरेदी करणारे लाखो ग्राहक आहे मात्र या लाखो ग्राहकांमध्ये ४०% लोकांची ऑनलाइन खरेदीत फसवणूक झाल्याचं अनेक वेळा उघड झालं आहे. मात्र अशा पद्धतीच्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांवर चाप बसवण्यासाठी सायबर क्राईमकडे नागरिकांनी तक्रारी दाखल कराव्यात असं अवाहन वेळोवेळी करण्यात येतं. तसंच, अशा पद्धतीच्या फेक ऑनलाईन खरेदी करण्यापासून नागरिकांनी सतर्क राहावं, असा आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे.
वाचाः अमेरिकेत शाळेत घुसून हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; २ विद्यार्थ्यांचा मृत्यू