धुळे तालुक्यातील लोहगड लोणखेडी या परिसरातील वृद्ध महिला व पुरुष धुळे शहरात एका खाजगी रुग्णालयात नेत्र तपासणी शिबिरासाठी ॲपेरिक्षाने धुळे शहरात येत होते. धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या जे.के. हॉस्पिटलजवळ एका अज्ञात वाहनाने ॲपे रिक्षाला कट मारला. त्यामुळे ॲपेरिक्षा चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा उलटली.
व्हॉट्सॲप ग्रुपवर भांडण, मध्यस्थी करणाराच गोत्यात, पुण्यात बिल्डरच्या गोळीबारात जखमी
या रिक्षामध्ये जवळपास १० ते १२ वृद्ध प्रवासी होते. या सर्व जखमी प्रवाशांना तात्काळ १०८ क्रमांकाच्या ॲम्बुलन्सने धुळे जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आले आहे. एकीकडे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येत असताना, मात्र दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अशा प्रकारे भीषण अपघात होत असल्याने रस्ता सुरक्षा सप्ताहवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील सावळदे पुलावरून तापी नदी पात्रात काल रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रक थेट अपघातग्रस्त होऊन तापी नदीपात्रात कोसळला असल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. २४ तास उलटून गेले असले तरीही ट्रक अद्याप सापडलेला नाही. मात्र बुडालेल्या ट्रक संदर्भात शोधकार्यादरम्यान महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले आहेत.
रब्बी पिकांचे हमीभाव जाहीर, गहू हरभऱ्याला अच्छे दिन, मसूरच्या दरात सर्वाधिक ५०० रुपयांची वाढ