राणे म्हणाले अनिल देशमुख व्हायचंय का?; शिवसेना नेत्यानं दिलं सडेतोड उत्तर

सिंधुदुर्गः शिवसेना नेते दिपक केसरकर (deepak kesarkar) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) व्हायचं नसेल तर केसरकरांनी विचार करुन बोलावं,’ असं वक्तव्य राणेंनी केलं होतं. यानंतर केसरकरांनी ‘नितेश राणेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावे अन्यथा राजकीय संघर्ष अटळ आहे,’ असा थेट इशारा दिला आहे.

सिंधुदुर्गात झालेल्या एका कार्यक्रमात नितेश राणे व शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एकमेकांची स्तुती केली होती. त्यामुळं राणे आणि शिवसेनेतील संघर्ष संपुष्टात आल्याची चर्चा होती. मात्र, आता राणे विरुद्ध दिपक केसरकर असा सामना पाहायला मिळत आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितेश राणेंनी दिपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. तसंच, गंभीर आरोपही केले होते. त्यांच्या या आरोपांना केसरकरांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे.

‘दिपक केसरकरांनी दुसरे नाना पटोले बनू नये, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला होता. तसंच, सावंतवाडीतील खेळणी घोटाळा, गोव्यात घेतलेल्या जमिनीसंदर्भात माहिती घेऊन ईडीकडे तपासाची मागणी करू व केसरकरांना दुसरा अनिल देशमुख बनायचं नसेल तर त्यांनी विचार बोलावं, असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं.

वाचाः पूर ओसरला आता महाकाय मगरींची दहशत! जीव मुठीत घेऊन जगताहेत सांगलीकर

नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर दिपक केसरकर यांनीही राणेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘फालतू धमक्या ऐकून घेण्याची मला सवय नाही. नितेश राणेंनी खात्री करून बोलावं व आपलं वक्तव्य मागे घ्यावं, नाहीतर राजकीय संघर्ष अटळ आहे, असा इशारा केसरकर यांनी दिला आहे. ‘शिवाय या अगोदरचा नारायण राणे यांच्या सोबतचा राजकीय संघर्ष मी सुरू केला नव्हता. तो राणेंनी सुरू केला होता. त्यामुळे नितेश राणेंनी स्वतः खाजवून खरूज काढू नये. सावंतवाडी संस्थानची परंपरा आहे. आम्ही कुणाला चिडवत नाही. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. परंतु कोण अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे मी राणेंबद्दल काही बोलणार नाही. परंतु त्यांनी जे बोलले ते तपासून पहावं व शब्द मागे घ्यावेत हा वाद इथेच मिटेल, असा समजूतीचा सल्ला यावेळी केसरकरांनी राणेंना दिला आहे.

वाचाः BMW चालकाची मुजोरी; कार हळू चालवा सांगणाऱ्या तरुणीला भररस्त्यात मारहा

वाचाः नितीनजी तुम्ही करून दाखवलं; मुख्यमंत्र्यांनी केलं गडकरींचे कौतुक

Source link

Deepak KesarkarNitesh Ranenitesh rane latest news in marathinitesh rane on deepak kesarkarदिपक केसरकरनितेश राणे
Comments (0)
Add Comment