सात मजली इमारतीच्या टेरेसवर गेली अन्… मुंबईत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने आयुष्य संपवलं

मुंबई: माटुंगा येथील खालसा कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय तरूणीने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी मुलुंडमध्ये घडली. नेहा दत्ताराम गिरप असे या तरुणीचे नाव असून इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेत तिने जीवन संपविले आहे. नेहाचे वडील मुंबई पोलीस दलामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

सात मजली इमारतीच्या टेरेसवर गेली अन्

मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा येथील ओम निकेतन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नेहा कुटुंबियांसह वास्तव्यास होती. मंगळवारी दुपारी तिने सात मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारली. याबाबत माहीती मिळताच नवघर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर नेहाला तात्काळ जवळच्या रूग्णालयात नेले. दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी मृत घोषित केले.

हेही वाचा -मुंबई विमानतळावर ३६ किलो सोनं सापडलं, असं लपवलं की विश्वास होणार नाही…

नेहा तणावात होती, ८ महिन्यांपासून उपचार घेत होती

एम.बी.ए . च्या पहिल्या वर्षात शिकणारी नेहा ही तणावात असल्याने तिच्यावर जसलोक रुग्णालयात डॉक्टर अमित देसाई यांच्याकडे गेल्या आठ महिन्यांपासून वैद्यकीय उपचार सुरु होते. परंतु, सुमारे चार दिवसांपासून ती जरा जास्तच तणावात असल्याची माहिती आहे. त्यातूनच तिने हे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. नेहाच्या या निर्णयाने संपूर्ण कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा -शाळेतून घरी जात होत्या, स्पीडब्रेकरवर दुचाकी आदळली अन् रस्त्यावर पडल्या, शिक्षिकेचा करुण अंत

Source link

cause of depressiondepressionhow depression is diagnosedhow to cure depressionmatunga newsmumbai livemumbai live newsMumbai Policemumbai police daughter finish lifepolice daughter finish life
Comments (0)
Add Comment