या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोमवारी विकासचा वाढदिवस होता. मात्र गावात वाढदिवसाचा केक भेटत नसल्याने विकास आणि त्याचा भाऊजी सुरेश भालेराव असे दोघेही फुलंब्रीला तालुक्याच्या ठिकाणी केक आणण्यासाठी दुचाकीने गेले. तालुक्यातील इतर शेतीची कामे आटोपून त्यांनी फुलंब्री येथून केक घेतला व दोघेही घराकडे दुचाकीने निघाले होते. दरम्यान फुलंब्री – राजुर रोडवरील ज्ञानसागर विद्यालयाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने विकासच्या दुचाकीला धडक दिली.
वाचाः इतिहासाचे साक्षीदार! ८ जलदुर्गांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये सामावेश होण्यासाठी उचलले मोठं पाऊल
दुचाकीवरील दोघेही साले-मेव्हणे यात गंभीररित्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडले होते. अपघातादरम्यान जोराचा आवाज झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी व रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविले. मात्र दुर्दैवाने विकासला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर विकासच्या भाऊजीला औरंगाबादेत रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी फुलंब्री पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे वाढदिवसाच्या दिवशीच विकासचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाचाः दौंडमधील सात जणांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट, पोलीस तपासात झाला मोठा उलगडा