पठाणसाठी शाहरुखने १०० कोटी घेतले? ३० वर्षांपूर्वी डेब्यू सिनेमासाठी मिळालेली केवळ इतकी फी

मुंबई : बॉलिवूड किंग खान शाहरुख खानने कित्येक वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. शाहरुखचे चाहतेही त्याच्या कमबॅकची वाट पाहत होते. आता पठाण प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये सिनेमाची, शाहरुखची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. अॅडव्हान्स बुकिंगमध्येच पठाणने मोठी कमाई केली आहे. आता शाहरुखने या सिनेमासाठी किती फी घेतली याची चर्चा आहे. शाहरुखने सर्वाधिक १०० कोटी चार्ज केल्याचं बोललं जात आहे, पण सुपरस्टार किंग खानने त्याच्या डेब्यूसाठी किती पैसे घेतले होते माहितेय का?

३० वर्षांपूर्वी झालेला डेब्यू

१९९२ मध्ये शाहरुखला मोठ्या पडद्यावर पहिली संधी मिळाली होती. त्यावेळी त्याचा पहिला सिनेमा दिवाना प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख सेकेंड लीडमध्ये होता, पण त्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्याच्या लूक, स्टाइलची त्यावेळी तुफान चर्चा झाली होती. त्या वर्षात शाहरुखचे चार सिनेमे प्रदर्शित झाले होते. त्यापैकी दिवाना सिनेमा हिट ठरला होता. ज्यावेळी शाहरुखने डेब्यू केला त्यावेळी केवळ त्याला एका संधीची गरज होती, त्याने फीबाबत कधीही विचार केला नव्हता.

हेही वाचा – शाहरुख खानचा ‘पठाण’ रिलीज, चाहत्यांनी अनुभवलं थिएटरचं स्टेडियम होणं

पहिल्या सिनेमासाठी मिळाले होते इतके पैसे

शाहरुखला सर्वात आधी दिल आशना सिनेमाची ऑफर होती, पण काही कारणांनी हा सिनेमा प्रदर्शित होण्यास विलंब झाला. एका मुलाखतीत शाहरुखने स्वत: सांगितलं होतं, की त्या सिनेमासाठी त्याला ४ लाख रुपये मिळाले होते.

हेही वाचा – आधी पठाण पाहू की हनीमूनला जाऊ?चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानचं भन्नाट उत्तर

तर त्याच वर्षात रिलीज झालेल्या राजू बन गया जेंटलमॅनसाठी त्याला २५ हजार रुपये मिळाले होते. हा सिनेमा चांगला चालला तर त्याला आणखी एक लाख रुपये दिले जातील असंही सांगण्यात आलं होतं, पण त्याला हे पैसे कधीही मिळाले नाहीत. पुढे एक-एक सिनेमा करत शाहरुखच नशीबच बदललं आणि तो केवळ भारतात नाही तर जगभरात किंग खान म्हणून ओळखला जातो. पठाणसाठी शाहरुखला किती फी मिळाली हे अद्याप स्पष्ट नाही, पण आता शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या लिस्टमध्ये सामील आहे.

Source link

pathaanshahrukh khashahrukh kha first movie feeshahrukh khan pathaanshahrukh khan pathaan feeपठाणशाहरुख खानशाहरुख पठाण फी
Comments (0)
Add Comment