‘पठाण’ झाला ऑनलाइन लीक
शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांचा पठाण सिनेमा बुधवारी म्हणजेच आज १०० हून अधिक देशांमध्ये रिलीज झाला आहे. पहिल्या दिवसासाठी ५ लाखांहून अधिक तिकिटांची विक्रमी अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. एकीकडे ही आनंदाची बातमी असताना टाइम्स नाऊने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हा सिनेमा आधीपासूनच Filmyzilla आणि Filmy4wap नावाच्या वेबसाइटवर एचडी प्रिंटमध्ये उपस्थित आहे. अशा परिस्थितीत, यशराजच्या निर्मात्यांनी पठाण सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचं आवाहन केलं. तसेच सिनेमाचं रेकॉर्ड केलेलं फुटेज काढून टाकण्याचंही आवाहनही त्यांनी केलं.
यशराज फिल्म्सने शेअर केली खास पोस्ट
यश राज चित्रपटांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रत्येकाला कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड करण्यापासून परावृत्त करण्याची, त्यांना ऑनलाईन सामायिक करणे आणि कोणतेही स्पीलर देण्याची विनंती केली जाते. पठाण फक्त थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवरच पाहा. हा सिनेमा फक्त हिंदीतच नाही तर तमिळ आणि तेलगूमध्येही प्रदर्शित झाला आहे.
दरम्यान, शाहरुख खानने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘पठाण’ पाहण्यासाठी विकत घेतलेल्या तिकिटांचा ढीग दिसत आहे. शाहरुखने फोटो शेअर करत लिहिले की, ‘अरे वा, सिनेमा पाहिल्यानंतर वापरलेल्या तिकिटांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा. धन्यवाद.’