नंदुरबार जिल्ह्याचा नवापूर तालुका हा गुजरात राज्य सीमा लगत असल्याने अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते महाराष्ट्र आणि गुजरात सीमावर मोठ्या प्रमाणात वनविभागाचे अधिकारी कर्मचारी गस्ती वर असतात पेट्रोलिंग करीत असतात याठिकाणी वनक्षेत्र आहेत. त्यामुळे नेहमीच छोट्या मोठ्या कारवाया या समोर येत आहेत. दोन्ही राज्यांच्या सीमा भागांच्या फायदा उचलत अवैध वाहतूक होत असते महागड्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असते. किंमती लाकूड म्हणून ओळख असलेले सागवान लाकडाची तस्करी देखील याभागात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. मोदल ,चिंच, लिंब ,बोर ,हिवर यासारखे लाकडांची देखील तस्करी केली जाते मात्र वनविभागाला आता महागडे सागवानी लाकूड हाती लागले आहे.
दिवाळीत साग आणि खैराची तस्करी होण्याचा धोका; सीमावर्ती भागातील वनपरिक्षेत्रांना ‘अलर्ट’
नवापूर तालुक्यातील तालुक्यातील हमाफळी गावालगत नाल्यात पिकपेरा करण्यात आला होता. या महसुल नाल्यातील पिकपेरा केल्याच्या मातीत सागवानी लाकडे लपवून ठेवण्यात आली होती. पाहणी दरम्यान ही बाब लक्षात आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने खोदून सागवानी लाकडे काढली. सुमारे सागवानी लाकडाचे गोल १२ नग अडीच लाख रुपये किंमतीचे जप्त केले. सदर लाकूडसाठा नवापूर शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आला. ही कारवाई धुळेचे वनसंरक्षक हौसिंग, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धुळे दक्षता पथकाचे विभागीय वनाधिकारी संजय पाटील, नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमंल, चिंचपाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी, सहायक वनसंरक्षक पर्यविक्षाधीन गणेश मिसाळ, नवापूर वनपरिक्षेत्र व चिंचपाड्याचे पथकाने कारवाई केली.