या सगळ्यात उर्फीला राहण्यासाठी आता नवीन जागा मिळत नाहीये. मुंबईत भाड्याने घर कोणी देत नसल्याचं तिचं म्हणणं आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तिला घर द्यायला घाबरत आहे. तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे उर्फीला कोणीही भाड्याने घर देत नाही. उर्फीने ट्विटरवर आपली व्यथा मांडत लिहिले की, ‘ते म्हणतात की तिच्या पेहरावामुळे मुस्लिम लोक तिला घर देत नाहीत आणि ती मुस्लिम आहे म्हणून हिंदू लोक तिला घर देत नाहीत. ते राजकीय धोक्याबद्दलही बोलतात. उर्फीने तिच्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, ‘मी ज्या प्रकारचे कपडे घालते त्यामुळे मुस्लिम घरमालक मला घर भाड्याने देऊ इच्छित नाहीत.’
उर्फी जावेदला मुस्लिमही घर देत नाहीत
उर्फी जावेदने आपल्या ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, ‘मी मुस्लिम असल्यामुळे हिंदू घरमालक मला भाड्याने घर देऊ इच्छित नाहीत. काही घरमालक मला सातत्याने राजकीय धमक्या येत असल्यामुळे ते घर द्यायला घाबरतात. मुंबईत भाड्याने घर मिळणं अवघड आहे.’ उर्फीच्या या ट्वीटवर अनेकांनी कमेंट करून तिचं सांत्वन केलं. काहींनी त्यांच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडल्याचं सांगितलं. एका यूझरच्या कमेंटवर उर्फीनेही उत्तर दिले.
उर्फी जावेदला प्रत्येक वेळी हा त्रास सहन करावा लागतो
जुने ट्वीट रिट्वीट करत अभिषेक भालेराव नावाच्या युझरने लिहिले की, ‘माझ्यासोबतही असेच घडले, आशा आहे की तुला लवकरच राहण्यासाठी चांगली जागा मिळेल.’ उर्फीने या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. तिने लिहिले की, ‘प्रत्येकवेळी मला अविवाहित, मुस्लिम आणि अभिनेत्री या तिघांसाठी घर शोधणं अशक्यप्राय वाटतं.’